Tur Import Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Import : तूर आयातीसाठी सरकारची धडपड

महागाईचा कांगावा करत केंद्र सरकारने शेतीमालाचे दर नियंत्रणात ठेवण्याचा गेल्यावर्षापासून प्रयत्न केला. याचा सर्वाधिक फटका कडधान्य उत्पादकांना बसला. त्यातही तूर उत्पादक शेतकरी मागील हंगामात भरडला गेला.

टीम ॲग्रोवन

पुणेः केंद्र सरकार तूर आयातीसाठी (Tur Import) सध्या पुढाकार घेत आहे. तुरीचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकार आयात करत आहे. मात्र आयात तुरीचेही दर (Tur Rate) तेजीत आहेत. त्यामुळे दर नियंत्रणाचा (Tur Rate Control) सरकारचा मनसुबा साध्य होणार नाही, असा दावा काही जाणकार करत आहेत.

महागाईचा कांगावा करत केंद्र सरकारने शेतीमालाचे दर नियंत्रणात ठेवण्याचा गेल्यावर्षापासून प्रयत्न केला. याचा सर्वाधिक फटका कडधान्य उत्पादकांना बसला. त्यातही तूर उत्पादक शेतकरी मागील हंगामात भरडला गेला. गेल्या हंगामात शेतकऱ्यांना बाजारात हमीभावही मिळाला नाही.

यंदा शेतकऱ्यांची नापसंती असो किंवा उशीरा सक्रिय झालेल्या माॅन्सूनमुळे असो, तूर लागवड कमी झाली. तसंच पावसानेही नुकसान झाले. त्यामुळे देशात तुरीची टंचाई निर्णाम झाली आहे. सध्या तुरीचे दर वाढले. मात्र तूर डाळीचे दर सरासरी महागाईपेक्षा कमीच वाढले.

यंदाच्या हंगामातच तूर उत्पादन कमी राहील. त्यामुळे सरकार आयात करून पुरवठा वाढविण्याचा प्रयत्न करतेय. आयातीत काही अडथळे आली तरी सरकार हे अडथळे दूर करण्यासाठी पुढाकार घेत आहे. मोझांबिक देशातून जास्तीत जास्त तूर आयातीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मोझांबिकमधून तूर निर्यात काही करणास्तव ठप्प झाली होती. मात्र भारत सरकारने मध्यस्थी करून मार्ग काढल्यामुळे तूर आयातीचा मार्ग मोकळा झाला.

सरकार आयातीतून तुरीचा पुरवठा वाढवून दर नियंत्रणात ठेवण्याचा मनसुबा बाळगून आहे. मात्र सरकारची ही रणनिती काम करेल असं वाटत नाही. कारण आयात तुरीही सध्या महाग पडत आहे. सध्या आफ्रिकेतून आयात होणारी तूर ६ हजार ते ६ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान पडत आहे.

आफ्रिकेतून आयात होणाऱ्या तुरीची गुणवत्ता कमी असते. त्यामुळे दरही कमी असतात. तर लेमन तूर ७ हजार ६५० रुपयाने मिळत आहे. त्यामुळे देशातील बाजारही यापेक्षा कमी होईल असे वाटत नाही, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. तुरीचा बाजार ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT