MSP of Raw Jute Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

MSP of Raw Jute : कच्च्या तागाच्या हमीभावात ३१५ रुपयांची वाढ; केंद्र सरकारचा निर्णय

Raw Jute : २०२५-२६ साठी कच्च्या तागाचा (टीडी-३) हमीभाव प्रतिक्विंटल ५ हजार ६५० रुपये जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ताग उत्पादकांना सरासरी ६६.८ टक्के अधिकचं उत्पन्न मिळेल, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

Dhananjay Sanap

Central Government Decision : केंद्र सरकारने २०२५-२६ च्या आर्थिक वर्षासाठी कच्चा तागाच्या किमान आधारभूत किंमतीत म्हणजेच हमीभावात वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय आर्थिक घडामोडी समितीची बैठक बुधवारी (ता.२२) आयोजित करण्यात आली. या बैठकीत कच्च्या तागाच्या हमीभावात प्रतिक्विंटल ३१५ रुपयांची वाढ केली. २०२५-२६ साठी कच्चा तागाचा (टीडी-३) हमीभाव प्रतिक्विंटल ५ हजार ६५० रुपये जाहीर करण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ताग उत्पादकांना सरासरी ६६.८ टक्के अधिकचं उत्पन्न मिळेल, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

गेल्यावर्षी केंद्र सरकारने १ लाख ७० हजार शेतकऱ्यांकडून ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मदतीने ताग खरेदी केली. तसेच २०१४-१५ ते २०२४-२५ या कालावधीत तब्बल १३०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा दावाही कृषी मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. तर २००४ ते २०१४ दरम्यान तत्कालीन युपीए सरकारने केवळ ४४१ कोटी रुपयांची ताग खरेदी केल्याच्या आकड्यांकडे कृषी मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात लक्ष वेधलं आहे.

केंद्र सरकारने २०१४-१५ मध्ये कच्चा तागासाठी २ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला होता. त्यामध्ये आत्तापर्यंत ३ हजार २५० रुपयांची म्हणजेच २.३५ पट वाढ करण्यात आल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकार ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत शेतकऱ्यांकडून ताग हमीभावाने खरेदी करतं. देशात ४० लाख कुटुंबाची उपजीविका प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ताग उद्योगावर अवलंबून आहेत. तर ४ लाख कामगारांना ताग कारखान्यात थेट रोजगार मिळतो. पश्चिम बंगालमध्ये ८२ टक्के तर आसाम आणि बिहारमध्ये प्रत्येकी ९ टक्के ताग उत्पादक शेतकरी आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT