Chana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement : शासकीय खरेदी केंद्रांत हरभरा विक्रीस प्रतिसाद

यंदा हरभऱ्याचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. मळणी मागील महिन्यातच सुरू झाली आहे. कमाल शेतकऱ्यांचा हरभरा घरात आहे.

Team Agrowon

Jalgaon News : शासकीय हरभरा खरेदीस अद्यापही सुरुवात झालेली नाही. परंतु यासंबंधी शेतकऱ्यांची ऑनलाइन नाव नोंदणी सुरू झाली आहे. खानदेशात शासकीय हरभरा खरेदीसंबधी (Chana Procurement) ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.

बाजारात हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा (Chana MSP) कमी आहेत. त्यामुळे या केंद्रात हरभरा विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बाजारात सध्या हरभऱ्याचे दर कमाल ४८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. जळगाव जिल्ह्यात १७ खरेदी केंद्रे सुरू केली जातील. तसेच धुळ्यात पाच, नंदुरबारात पाच खरेदी केंद्रे सुरू राहतील.

जळगावात एका केंद्रात रोज किमान एक हजार अर्ज हरभरा विक्रीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून येत आहेत.

यंदा हरभऱ्याचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. मळणी मागील महिन्यातच सुरू झाली आहे. कमाल शेतकऱ्यांचा हरभरा घरात आहे. तर काही शेतकऱ्यांनी त्याची विक्री केली आहे. यामुळे खरेदी मर्यादा व लक्ष्यांकदेखील वाढविण्याची मागणी केली जात आहे.

एकरी ७ ते ८ क्विंटल उत्पादन आले आहे. यामुळे खरेदीसंबंधी हेक्टरी २० क्विंटलची नवी मर्यादा जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

देशी, देशी सुधारित व देशी संकरित हरभऱ्याची पेरणी खानदेशात अधिक केली जाते. यामुळे शासनालाही खरेदीसंबंधी नवी मर्यादा व नवे धोरण आणावे लागेल, अशी स्थिती आहे.

जळगावात ५ हजार शेतकऱ्यांकडून नोंदणी

हरभरा पीकपेरऱ्याचा सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्रे शेतकऱ्यांना सादर करावी लागत आहेत. त्यासाठी शेतकरी संबंधित खरेदी केंद्रात पोहोचत आहेत.

या नोंदणीसाठी जिल्ह्यात रावेर, अमळनेर, चोपडा, जळगाव, यावल, जामनेर, मुक्ताईनगर या सर्वच भागांत प्रतिसाद मिळत आहे.

दोन दिवसांत जळगाव जिल्ह्यात पाच हजारांवर शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी, ऑनलाइन अर्ज सादर झाले आहेत. धुळे व नंदुरबारातही अडीच हजारांवर अर्ज आले आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT