Gpld Rate
Gpld Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gold Rate : तीन महिन्यांत सोने तेजाळण्याची शक्यता

टीम ॲग्रोवन

जळगाव : सध्या सोन्याच्या बाजारात (Gold Market) मंदीचे वातावरण आहे. सोन्याचे भाव (Gold Rate) दिवसेंदिवस कमी होत आहेत. सध्या भाव ५० हजार ८०० प्रतितोळा आहेत; मात्र येत्या तीन महिन्यांत सोन्याच्या किमतीत सोळा टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असा अंदाज सोने, चांदीच्या व्यापाऱ्यांनी (Silver Trader) वर्तविला आहे. आता देशांतर्गत बाजारात सोने (Domestic Gold Market) प्रतिदहा ग्रॅमसाठी ५१ हजार रुपये आहे. मात्र सोने-चांदीच्या व्यापारातील विश्‍लेषकांच्या मते या वर्षाच्या शेवटपर्यंत सोने देशांतर्गत बाजारात साठ हजारांपर्यंत पोहोचू शकते.

विश्‍लेषकांच्या मते देशात महागाई निश्‍चितच आहे. महागाई खाली येत आहे. परंतु जागतिक स्तरावर वस्तूंच्या किमती अधिक काळासाठी वाढलेल्या राहू शकतात. यामुळे सोन्याच्या दरवाढीला आधार मिळत आहे. कारण याला महागाईपासून बचावाचे साधन मानले जाते. महागाई वाढली, की सोन्यातील गुंतवणूक वाढते, असा आजवरचा इतिहास आहे. इतर देशातील परिस्थितीही याला कारणीभूत आहे. अमेरिकेतील मंदीची भीती, व्याजदरातील वाढ, शेअर बाजारातील अवास्तव तेजी आणि भू-राजकीय तणाव अशी यामागची कारणे असू शकतात.

शिवाय, ‘ब्लूमबर्ग’च्या सांगण्यानुसार वाढलेली महागाई अधिक काळापर्यंत राहील. यामुळे व्याजाचा दर वाढत राहील. आर्थिक मंदीकडे वाटचाल होणार नाही. अमेरिकेतील वेल्स फार्गोच्या अहवालानुसार ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मंदीची सुरुवात होईल, अशा स्थितीत डॉलर घसरेल व सोन्यात तेजी येईल.

तीन वर्षांतील सोन्याचे दर असे

वर्ष दर

७ ऑगस्ट २०२० ५६ हजार १२६

१ डिसेंबर २०२० ४८ हजार ५९२

५ फेब्रुवारी २०२१ ४७ हजार २३७

३१ मार्च २०२१ ४४ हजार १९०

१ जून २०२१ ४९ हजार ३१९

२८ सप्टेंबर २०२१ ४५ हजार ९५७

१८ नोव्हेंबर २०२१ ४९ हजार २३५

७ मार्च २०२२ ५३ हजार ५९५

२५ ऑगस्ट ५२ हजार ९४

३१ ऑगस्ट २०२२ ५१ हजार ५००

२ सप्टेंबर २०२२ ५० हजार ८००

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी-मंदीवर सोन्याचे दर अवलंबून असतात. आता सध्या दर कमी असले तरी आगामी काळात ते वाढतील की कमी होतील, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरविले जाते; मात्र भविष्यात सोन्याला चांगला दर असेल हे निश्‍चित.
मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT