Gultekdi APMC Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pune APMC : आले खरेदी व्यवहार बंद पाडले

‘स्वाभिमानी’ची गुलटेकडी बाजार समितीवर धडक

टीम ॲग्रोवन

पुणे ः गुलटेकडी बाजार समितीवर (Gultekdi APMC) स्वाभिमानी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghtna) धडक देत आल्याचे सौदे बंद पाडले. यानंतर दोन टन आले जप्त करण्यात आले असून, उत्पादक शेतकऱ्याची होणारी लूट थांबविण्यासाठी सातारा, सांगली व पुणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Pune Swabhimani Shetkari Sanghtna) वतीने ही धडक मारण्यात आली.

संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे विभागीय अध्यक्ष प्रकाश बालवडकर, युवा प्रदेश अध्यक्ष अमर कदम यांच्या नेतृत्वाखाली ही धडक मंगळवारी (ता.१७) पहाटे मारण्यात आली.

या वेळी सर्व कार्यकर्ते व शेतकरी बाजार समितीमध्ये घुसले. आले उत्पादकांची लूट थांबलीच पाहिजे, आल्याची खरेदी-विक्री सरसकट झाली पाहिजे, वर्गवारी न करता सौदे झाले पाहिजेत, जुन्या-नव्या आल्याची एकत्रच खरेदी करावी अशा विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या.

तसेच, यापुढे कोणत्याही व्यापाऱ्याने स्वतंत्र प्रतवारी करून खरेदी केल्यास त्या व्यापाऱ्याला बदडून काढू, असा इशारा पवार आणि खराडे यांनी दिला आहे. तसेच ज्या व्यापाऱ्यांनी वर्गवारी करून आले खरेदी केली होती, ते दोन टन आले राज्य प्रवक्ते अनिल पवार सातारा युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, खटाव तालुकाध्यक्ष दत्तुकाका घार्गे यांनी जप्त करून बाजार समितीच्या हवाली केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Maharashtra Drought Crisis: वगळलेल्या तालुक्यांचा दुसऱ्या यादीत समावेश; मुख्यमंत्री फडणवीस

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

SCROLL FOR NEXT