Sugarcane FRP Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugarcane FRP : उसाच्या एफआरपीत टनास १५० रुपये वाढ

गेल्या हंगामात १० टक्के साखर उताऱ्यासाठी २९०० रुपये एफआरपी होती. आता १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी ३०५० रुपये (वाहतूक खर्चासहित) मिळतील.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : ‘‘केंद्र सरकारने यंदाच्या गळीत हंगामात (Sugarcane Crushing Season) गाळप होणाऱ्या उसाच्या (२०२२-२३) ‘एफआरपी’त (Sugarcane FRP) प्रतिटन १५० रुपयांनी वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ आणि आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीची बैठक बुधवारी (ता.३) झाली. यामध्ये उसाच्या रास्त व किफायतशीर भावात (एफआरपी) (Sugarcane Fair Remunerative Price) वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

गेल्या हंगामात १० टक्के साखर उताऱ्यासाठी २९०० रुपये एफआरपी होती. आता १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी ३०५० रुपये (वाहतूक खर्चासहित) मिळतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाच्या एफआरपीत २.६ टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामासाठी ही एफआरपी लागू असेल.

ऊस उत्पादकांचा वाढता उत्पादन खर्च पाहून केंद्राने एफआरपीत वाढ केली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.
प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
एफआरपीत वाढ ही शेतकऱ्यांसाठी सुखकारक बाब आहे. केंद्राने साखरेच्या किमान विक्री मूल्याची वाढ करावी, अशी आमची मागणी आहे.
पी. जी. मेढे, साखर उद्योगातील तज्ज्ञ

गेल्या चार वर्षांतील एफआरपी

वर्ष...एफआरपी (प्रतिटन, रुपये)

२०१९-२०...२७५०

२०२०-२१...२८५०

२०२१-२२...२९००

२०२२-२२...३०५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT