Flower Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Flower Market : रत्नागिरीत फुलांची आवक घटली

Flower Arrival Update : मार्गशीर्ष महिन्यातील धार्मिक पूजा विधी, लग्न सोहळा अशा कार्यक्रमांमुळे विविध प्रकारच्या फुलांची विक्री वाढलेली आहे. मात्र गेल्या आठ दिवसांत पश्चिम

राजेश कळंबटे

Ratnagiri News : मार्गशीर्ष महिन्यातील धार्मिक पूजा विधी, लग्न सोहळा अशा कार्यक्रमांमुळे विविध प्रकारच्या फुलांची विक्री वाढलेली आहे. मात्र गेल्या आठ दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडलेली असून फुलांची रत्नागिरी जिल्ह्यातील आवक घटलेली आहे. त्यामुळे फुलांचे दर वधारलेले आहेत. सध्या गुरूवारी व्रतवैकल्यासाठी सुमारे पाच टनांहून अधिक फुलांची विक्री होत असून त्यामधून सुमारे १० लाखांची उलाढाल होते.

सध्या लगीन सराई सुरू झाली आहे. अलीकडच्या काळात लग्न समारंभात इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडून सजावटीची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यांच्याकडून फुलांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. गतवर्षी विवाहाच्या तारखा व लग्न योग कमी होते. त्यामुळे प्रलंबित राहिलेले विवाह सोहळे यंदा आटपून घेण्यावर भर दिला जात आहे.

फुलांची सजावट करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक कलाकार पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, मुंबईतून घाऊक फुले मागवितात. तसेच सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असल्यामुळे घरोघरी श्री महालक्ष्मी देवीची पूजा, घट मांडणी केली जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात फुले खरेदी केली जात आहेत. गजरे, हार, वेण्या यांना बाजारात मोठी मागणी आहे.

परंतु थंडी वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधूनच फुले कमी येत आहेत. आवक घटल्यामुळे फुलांचे दरही वाढलेले आहेत. आठ दिवसांपूर्वी १२० ते १५० रुपये किलोने विकला जाणारा झेंडूला बाजारात २०० रुपये दर आहे. गुलाब ४०० किलो तर १०० ते १५० रुपयांची शेवंती ३०० रुपये किलो आहे. रत्नागिरीत सरासरी २ ते ३ टन फुलांची विक्री होते. मात्र सध्या व्रतवैकल्यामुळे गुरुवारच्या सुमारास एका दिवसात ५ टन माल विक्री होते. सध्या फूल व्रिक्रेतेही वाढलेले आहेत.

गेल्या काही दिवसांत थंडी वाढलेली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून फुले कमी येत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांकडूनही कमी आवक असल्याने सध्या बाजारात फुलांचे दर वाढलेले आहेत.
निखिल पवार, कुवारबाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : मॉन्सूनचा वेगवान प्रवास; मुंबई गाठली, विदर्भात वर्ध्यापर्यंत मजल

Livestock Fodder Management: कमी पावसाच्या परिस्थितीत शाश्‍वत चारा व्यवस्थापन

Kharif Sowing 2026 : देशात कापूस, सोयाबीन, ऊस, भात लागवड पिछाडीवर; भरडधान्य, तूर, मक्याची आघाडी

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरु

Khoya Production Mechanization: खवा उत्पादनातील यांत्रिकीकरण

SCROLL FOR NEXT