Mango Season Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Season : सिंधुदुर्गातून आंब्याची पहिली पेटी नाशिकला रवाना

Mango Export : जुलै-ऑगस्ट महिन्यात आलेल्या मोहोराचे संरक्षण करून त्यांनी उत्पादन घेतले आहे. आंब्याची पहिली पेटी पाठविण्याचा मान त्यांनी चौथ्यांदा मिळविला आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता.मालवण) येथील आंबा बागायतदार उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांच्या बागेतून हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला पाठविण्यात आली आहे. चार डझन आंब्याच्या या पेटीला २५ हजार रुपये दर मिळाला आहे.

जुलै-ऑगस्ट महिन्यात आलेल्या मोहोराचे संरक्षण करून त्यांनी उत्पादन घेतले आहे. आंब्याची पहिली पेटी पाठविण्याचा मान त्यांनी चौथ्यांदा मिळविला आहे. सिंधुदुर्गात या वर्षी ६ जून ते आतापर्यंत अखंडपणे मुसळधार पाऊस सुरू आहे.

मात्र अशा प्रकारे प्रतिकूल वातावरण असतानाही मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील उत्तम फोंडेकर यांनी जुलै, ऑगस्टमध्ये हापूस आंब्याच्या काही झाडांना मोहोर आला होता. त्या मोहोराचे संरक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक वर्षी ते काही झाडांवरील मोहोराचे संरक्षण करीत असतात.

केवळ सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करून त्यांनी हा मोहोर टिकविला आहे. त्यातून आता त्यांना दोन ते तीन पेटी आंबा उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. यातील पहिली चार डझन आंब्याची पेटी पाडव्याचा मुहूर्तावर त्यांनी नाशिक येथील ग्राहकाला विक्री केली. या ग्राहकाकडून त्यांना २५ हजार रुपये दर देण्यात आला आहे.

आणखी पंधरा ते वीस दिवसांनी आणखी चार डझन आंबा उत्पादन त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे. श्री.फोंडेकर यांनी यापूर्वी तीन वेळा सर्वप्रथम आंबा पेटी पाठविण्याचा मान मिळविला होता. आता चौथ्यांदा त्यांनी पेटी पाठविली आहे.

पावसाळ्यात मोहोर आलेल्या तीन-चार झाडांवरील मोहोराचे संरक्षण करण्याचा मी दर वर्षी प्रयत्न करतो. आतापर्यंत तीन वेळेस राज्यातून सर्वप्रथम आंबा पेटी पाठविण्याचा मान मला मिळाला आहे. चौथ्यांदा हा मान मला मिळाला आहे. केवळ सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करून हे उत्पादन घेतले आहे.
- उत्तम फोंडेकर, आंबा बागायतदार, कुंभारमाठ, ता. मालवण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT