Kheda Kharedi Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Kheda Kharedi : खेडा खरेदीमुळे व्यापाऱ्यांकडून पाच लाखांचा दंड वसूल

खेड खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूट आणि बाजार समितीच्या उत्पन्नावर होणारा परिणाम लक्षात घेऊन कोरपना बाजार समितीने अशा अनधिकृत खरेदीदारांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे.

टीम ॲग्रोवन

चंद्रपूर ः खेड खरेदीच्या (Kheda Kharedi) माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूट आणि बाजार समितीच्या उत्पन्नावर (APMC Income) होणारा परिणाम लक्षात घेऊन कोरपना बाजार समितीने अशा अनधिकृत खरेदीदारांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. या माध्यमातून बाजार समितीने तब्बल ३६ व्यापाऱ्यांवर कारवाई करीत त्यांच्याकडून तब्बल चार लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत धानाच्या जोडीला शेतकरी सोयाबीन, कपाशीची पिके घेतात. सध्या कापसाचा हंगाम सुरू आहे. खेडा खरेदीला देखील वेग आला आहे. काही शेतकऱ्यांना रोख पैशाचे, तर काहींना जागेवर खरेदीचे आमिष दाखवीत कमी पैशात कापसाची खरेदी केली जाते.

त्यासोबतच मापात पाप करण्याचे धोरणही व्यापारी अवलंबितात. या माध्यमातून शेतकऱ्यांची फसगत होत आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रणासाठी कोरपना बाजार समितीने भरारी पथकाचे गठण केले आहे. बाजार समितीचे सचिव कवडू देरकर यांच्यासह प्रकाश गोरे, आरिफ अली, महेश जेऊरकर, देवराव पारखी यांचा पथकात समावेश आहे.

‘‘कोरपना व जिवती तालुक्‍यातील गावांमध्ये भरारी पथकाने मोहीम राबवीत अनधिकृतपणे कापसाची खरेदी करणाऱ्यांविरोधात कारवाई केली. तब्बल ३६ व्यापाऱ्यांवर कारवाई करीत ४ लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसूल केला’’, असे सचिव कवडू देरकर यांनी सांगितले. खांदला, तांबडी, धानोली, नारंडा, मेहंदी, कऱ्हाळगाव, लोणी या गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. बाजार समितीचे कार्यक्षेत्र जीवती आणि कोरपना असे दोन तालुके असून, त्यात १०४ गावांचा समावेश आहे.

व्यापाऱ्यांकडून अनधिकृतपणे खरेदी केलेल्या शेतीमालावर १८ टक्‍के दंड आकारण्याची तरतूद आहे. बाजार समितीच्या या कारवाईने अनेकांनी परवाने घेत अधिकृत व्यवसायावर भर दिला आहे. खासगी व्यापारी ८२०० रुपये क्‍विंटलने कापसाची खरेदी करीत आहेत. परंतु या व्यवहारात आर्थिक फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना दाद मागत येत नाही.

- कवडू देरकर, सचिव, बाजार समिती, कोरपना, चंद्रपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT