Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Procurement : नाफेडच्या तूर नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

Tur Market : राज्य शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करूनही अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाली नाही. त्यामुळे अगोदरच शेतकऱ्यात असंतोष आहे.

Team Agrowon

Latur News : राज्य शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करूनही अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाली नाही. त्यामुळे अगोदरच शेतकऱ्यात असंतोष आहे. त्यात शासनाने हमी भावाप्रमाणे तुरीची खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. याची मुदत ता. २४ मार्च रोजी संपत आहे.

गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात शासनाच्या हमी भाव खरेदी केंद्रासाठी केवळ ६९५ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. त्यामुळे शासनाच्या तूर खरेदी नोंदणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. या वर्षी शासनाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरु केले होते. या करिता देखील शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. अत्यंत कासवगतीने ही सोयाबीन खरेदी झाली.

बारदाना नसल्याने अनेक दिवस खरेदी बंद राहिली. याचा फटका नोंदणी करूनही शेतकऱ्यांचे सोयबीन शासनाने खरेदी केले नाही. यात मराठवाड्यात अडीच लाख शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडले होते. सोयाबीन पाठोपाठ आता शासनाने हमी भावाने तुरीची खरेदी करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे.

२४ जानेवारी ते ता. २४ मार्च या कालावधीत शेतकऱ्यांची नोंदणी करून घेतली जात आहे. ही मुदत संपण्यासाठी केवळ तीन दिवसच शिल्लक राहिले आहेत.जिल्ह्यात नाफेडच्या वतीने १९ खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. पण याकरिता आतापर्यंत केवळ ६९५ शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे. त्यामुळे या शासनाच्या खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्ह्यात सोयाबीनसाठी नाफेडचे १६ खरेदी केंद्र होते. यावेळेस त्यात तीनने वाढ झाली आहे. तुरीसाठी १९ खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. आतापर्यंत तुरीसाठी ६९५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पण सध्या खरेदी सुरु झालेली नाही. या वर्षी तुरीचा पेराही कमी होता आणि बाजारात भाव चांगला आहे. त्याचा परिणाम नोंदणीवर झाल्याचे दिसत आहे.
— विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, लातूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT