Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : कांदा दर घसरल्याने लिलाव बंद पाडून रास्ता रोको

उन्हाळ कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी (ता. २३) प्रहार जनशक्ती पक्ष व संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी देवळा बाजार समितीत लिलाव बंद करून पाचकंदील येथे रास्ता रोको आंदोलन केले.

टीम ॲग्रोवन

देवळा, जि. नाशिक : उन्हाळ कांद्याच्या भावात (Onion Rate) सातत्याने घसरण होत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी (ता. २३) प्रहार जनशक्ती पक्ष व संतप्त कांदा उत्पादक (Onion Farmer) शेतकऱ्यांनी देवळा बाजार समितीत लिलाव बंद करून पाचकंदील येथे रास्ता रोको आंदोलन केले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ३० रुपये प्रतिकिलो भाव अपेक्षित आहे. मात्र, त्यामानाने अत्यल्प भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या या संतप्त भावना शासनाला कळाव्यात, यासाठी बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या व संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी देवळा बाजार समितीत कांदा लिलाव बंद करून पाच कंदीलवर रास्ता रोको आंदोलन केले.

या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे, युवा तालुकाध्यक्ष बापू देवरे, तालुकाध्यक्ष नानाजी आहेर, युवा तालुकाध्यक्ष शशिकांत पवार, सटाणा तालुकाध्यक्ष गणेश काकुळते, खर्डे येथील उपसरपंच सुनील जाधव, विकास सोसायटीचे संचालक संदीप पवार, माधव ठोंबरे, भाऊसाहेब पवार, शशिकांत ठाकरे, विनोद आहेर, नाना गांगुर्डे, रामदास पवार, नितीन देवरे आदी शेतकरी उपस्थित होते.

उन्हाळ कांद्याला अपेक्षीत दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. महागडे कांदा बियाणे विकत घेऊन कांद्याची लागवड केली. त्यासाठी हजारो रुपये खर्च झाला.

कांद्याला भाव वाढेल, या आशेने शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला; मात्र, या कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. सध्या कांद्याला केवळ सातशे ते आठशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यातून उत्पादन खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांचा असंतोष तीव्र; भावना शासनापर्यंत पोहोचवा

कांद्याला उत्पादन खर्चाखाली दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा असंतोष तीव्र असून, या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात, या मागणीचे निवेदन पदाधिकारी व शेतकऱ्यांनी यांनी सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांना दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT