Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

MSP : हमीभाव केंद्रांपेक्षा बाजाराला शेतकऱ्यांचे प्राधान्य

किमान आधारभूत दराने मकासह मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे.

Team Agrowon

औरंगाबाद : किमान आधारभूत दराने मकासह मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी (Soybean Procurement) ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. शिवाय आता खरेदीची प्रक्रिया (Procurement Process) ही सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजून नोंदणी झाली नाही. बाजारात (Market) या शेतमालांना अधिकचा दर मिळतो आहे. त्यामुळे किमान आधारभूत दराने खरेदी तूर्त घोषणेपुरती मर्यादित आहे.

किमान आधारभूत दराने शेतमाल खरेदीसाठी अजून लक्ष्यांक दिलेला नाही. शिवाय नोंदणी झाली तर खरेदी होईल. हमी भावापेक्षा बाजारभाव सध्या जास्त आहे, त्यामुळे नोंदणी अजून झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. किमान आधारभूत दरांत शेतीमाल खरेदीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात जाधववाडी, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री व पाचोड या ठिकाणावरून नोंदणीला व आता खरेदीला सुरवात झाली आहे.

परंतु प्रत्यक्षात मका वगळता इतर कोणत्याही पिकासाठी शेतकऱ्यांनी किमान आधारभूत दराने खरेदी करताना नोंदणी केलेली नाही. त्यामुळे खरेदी सुरू झाली तरी प्रत्यक्षात खरेदी केंद्रांवर मालच येणार नसल्याची स्थिती आहे. मक्का नोंदणीसाठी दहा नोव्हेंबर पर्यंत मुदत होती. ती वाढवून आता ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे. .

४८ शेतकऱ्यांची नोंदणी...

आजवर किमान आधारभूत दराने मका खरेदीसाठी ४८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये गंगापूरच्या केंद्रावर नोंदणी केलेल्या २७ शेतकऱ्यांसह करमाड केंद्रावरील ७, खुलताबाद केंद्रावरील दोन व वैजापूर केंद्रावरील १२ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

असे आहेत दर...

शासनाने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत दरानुसार मुगाची प्रतिक्विंटल ७७५५ रुपये, उडदाची प्रतिक्विंटल सहा ६६०० रुपये तर सोयाबीनची ४३०० रुपये प्रतिक्विंटल ने खरेदी केले जाणार आहे. जवळपास ७ फेब्रुवारीपर्यंत खरेदीची प्रक्रिया सुरू राहणार, असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT