Onion Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion : कांदा खरेदी झालीच नाही, शेतकरी संघटना आक्रमक

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी (ता. २४) विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदीच सायंकाळपर्यंत न झाल्याने शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी (ता. २४) विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदीच (Onion Procurement) सायंकाळपर्यंत न झाल्याने शेतकरी संघटना (Farmer Association Aggressive On Onion Procurement) चांगलीच आक्रमक झाली. या प्रकरणी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

या संदर्भात अधिक माहितीनुसार, लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी कांदा विक्रीसाठी शेतकरी आले. परंतु व्यापारी मात्र बाजार समितीच्या आवारात आलेच नाही. त्यामुळे अनेक वाहनांमध्ये आपला कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच वाताहात झाली. कांद्याची खरेदी न झाल्यामुळे तो घेऊन येण्यासाठी लागणारा खर्च याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे जिल्हाध्यक्ष नीलेश बारगळ यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली.

कोणतीही पूर्वसूचना न देता कांदा खरेदी करण्यासाठी व्यापारी आले नाहीत. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा घेऊन येण्यासाठी लागणारा खर्च वाया गेला. शेतकऱ्यांना झालेला नाहक त्रास लक्षात घेता बाजार समिती अंतर्गत जे परवानाधारक ४३ व्यापारी आहेत, त्या सर्वांचे परवाने तत्काळ रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने बाजार समितीच्या सभापतींना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.याप्रकरणी बाजार समिती काय भूमिका घेते याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT