Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : तूर मोजणीतील अनागोंदी: खामगाव बाजार समितीवर शेतकऱ्यांचा रोष

Tur Rate : तुरीचा हंगाम सुरू झाला आहे. खामगाव बाजार समितीत जिल्ह्याच्या विविध भागांतून तुरीची आवक होत आहे.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आणलेल्या तुरीच्या मापात खरेदीदाराने अधिक माल घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात बाजार समितीत संबंधित मापारी, खरेदीदाराविरुद्ध कठोर पाऊले उचलत परवाना निलंबनाची कारवाई केली आहे. शिवाय येत्या काळात असे प्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक परवानाधारकास सूचना करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तुरीचा हंगाम सुरू झाला आहे. खामगाव बाजार समितीत जिल्ह्याच्या विविध भागांतून तुरीची आवक होत आहे. दोन दिवसांपूर्वी गोसिंग येथील शेतकरी बाबूराव इंगळे यांनी ४० क्विंटल तूर विक्रीसाठी आणली होती. बाजार भावानुसार तेव्हा ही तूर त्यांनी विकली.

त्यानंतर मालाची मोजणी होत असताना प्रत्येक पोत्यात पाच ते सात किलो अधिक माल घेतला जात असल्याचा संशय शेतकऱ्याला आला. त्यांनी मोजणी झालेल्या तुरीच्या पोत्यांची पुन्हा मोजणी करण्याचा आग्रह केला असता पाच ते सहा किलो माल प्रत्येक पोत्यात अधिक मिळाला.

एका क्विंटलमागे एवढी तूर अधिक घेतली जात असल्याने फसवणूक झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारात एकच कल्लोळ केला. संबंधित खरेदीदार, मापाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांनी गांभिर्याने दखल घेत सावता ट्रेड अडत्याचा परवाना निलंबित करण्याचा आदेश दिला.

प्रकरण दाबण्याचे प्रयत्न

पोत्यात तूर शिल्लक मोजण्याबाबतचा प्रकार समोर आल्यानंतर शेतकऱ्याने प्रकरण मिटवावे यासाठी त्यांना अधिक तूर परत देण्याचे आमिष देण्यात आले. मात्र, संबंधित शेतकऱ्याने याला भाव न देता बाजार समिती प्रशासनाकडे थेट तक्रार केली.

चौकशीची गरज

संबंधित शेतकऱ्याच्या लक्षात तूर मोजणीतील घोळ आल्यामुळे हे बिंग फुटले. संबंधित खरेदीदार दररोज मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत होता. त्यांनी यापूर्वीही असा घोळ केला असावा असा संशय या प्रकरणानंतर आता घेतल्या जाऊ लागला आहे. प्रकरणाची चौकशी होण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT