Tur Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Procurement : तुरीची शासकीय खरेदी केंद्रे सुरू करा

Tur Market : खरिपातील तूर बाजारात येण्यास प्रारंभ झाला असून खुल्या बाजारात तुरीला हमीदराच्या तुलनेत कमी दर मिळत आहे.

Team Agrowon

Amaravati News : खरिपातील तूर बाजारात येण्यास प्रारंभ झाला असून खुल्या बाजारात तुरीला हमीदराच्या तुलनेत कमी दर मिळत आहे. तुरीची हमीदराने शासकीय खरेदी करण्याचा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात खरेदी केंद्र मात्र सुरू झालेले नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने पडत्या दराने तूर विक्री करावी लागत असल्याने तातडीने खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने शासनाला केली आहे.

गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी तुरीला बाजारात ११ हजार रुपयांपर्यंत दर मिळत होते. खरीप हंगामातील नवीन तूर बाजारात आल्यानंतर हे दर पडले असून, सद्यःस्थितीत हमीदरापेक्षाही कमी दर मिळू लागले आहेत.

शासनाने शासकीय खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला व नोंदणी सुरू केली असली तरी प्रत्यक्षात खरेदी केंद्र मात्र सुरू केलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, ते टाळण्याकरिता येत्या दोन, तीन दिवसांत खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी संचालक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला केली आहे.

शासकीय तूर खरेदीत तूर या शेतमालाचा उत्पादकता परिगणना करताना ते प्रति हेक्टरमध्ये पूर्ण पेरा सामाईक क्षेत्र म्हणून परिगणना करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

सभापती हरीश मोरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना नाना नागमोते, किशोर चांगोले, प्रमोद इंगोले, भय्या निर्मळ, प्रकाश काळबांडे, श्रीकांत बोंडे, प्रवीण अळसपुरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT