Soymeal Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : ...तरच येईल सोयाबीन दरात तेजी

Soymeal Export : देशात सोयाबीनचे दर दबावात आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना नुकसान सोसावे लागत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : देशात सोयाबीनचे दर दबावात आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना नुकसान सोसावे लागत आहे. त्याची दखल घेत सोयाबीन दरात तेजीच्या अनुषंगाने सोयापेंड निर्यातीला अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे.

देशात सोयाबीनवर प्रक्रियेअंती ९० लाख टन सोयापेंडचे उत्पादन होते. त्यातील ६० लाख टन पोल्ट्री, तर १० लाख टन सोयापेंडचा वापर पशुपालन क्षेत्रात आहार म्हणून होतो. त्यानंतर देखील २० लाख टन सोयापेंड शिल्लक राहते.

या शिल्लक सोयापेंडच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यातच यंदा मका, तांदूळापासून इथेनॉल तयार करण्याला मान्यता मिळाली. मका तसेच तांदळावर प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून देखील २० लाख टन पेंडेची उपलब्धता झाली आहे. यातील तांदूळ पेंड ८ रुपये किलो, मका १४ रुपये किलो, तर सोयापेंड ४२ रुपये किलो याप्रमाणे बाजारात उपलब्ध आहे. प्रोटीनचा विचार करता मका पेंडमध्ये ५१ टक्‍के, तर सोयापेंडमध्ये ४६ टक्‍का इतके प्रोटीन आहे.

सोयापेंडच्या तुलनेत दरात कमी आणि प्रोटीनचे प्रमाणही अधिक त्यामुळे देशाअंतर्गंत मका आणि तांदळापासून तयार पेंडेला मागणी वाढली आहे. त्याचाही परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला आहे. सुमारे २० लाख टन सोयापेंड शिल्लक असल्याने देशांतर्गत सोयाबीनचे दर दबावात आले आहेत. सोयाबीनला ४८९२ रुपयांचा हमीभाव असताना बाजारात ३८०० ते ४००० रुपयांनी सोयाबीन विकले जात आहे.

सोयाबीन उत्पादकांमध्ये यामुळे आक्रोश असल्याने त्याची दखल घेत सोयाबीन पेंड निर्यातीला अनुदान मिळाल्यास त्याचा फायदा सोयाबीन उत्पादकांना होणार आहे. परिणामी, सोयापेंड निर्यात अनुदान देण्याचा निर्णय व्हावा, अशी शिफारसवजा मागणी महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

नॉन जीएम सोयापेंडला मागणी

अर्जेंटिनामध्ये ३६ क्‍विंटल, तर भारतात सोयाबीनचा उतारा अवघा ९ क्‍विंटल आहे. मात्र नॉन जीएम असल्यामुळे भारतीय सोयापेंडला मागणी राहते. एक क्‍विंटल पेंडला १००० रुपयांचे निर्यात अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘दर साडेपाच क्विंटलपर्यंत पोहोचतील’

सोयाबीन दरात वाढीसाठी म्हणून सुरुवातीला खाद्यतेलावर २० टक्‍के आयात शुल्क लावण्यात आले. त्यातून ३० हजार कोटी रुपये यातून भारत सरकारला मिळाले. यातील ५ हजार कोटी रुपये सोयापेंड निर्यात अनुदान म्हणून खर्ची घातल्यास सध्याच्या सोयाबीन दरात वाढ होऊन ते साडेपाच हजार क्‍विंटलपर्यंत पोहोचतील, असा विश्‍वास महाराष्ट्र कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्‍त केला.

खाद्यतेल आयात शुल्कमुक्‍त करण्यात आले होते. त्यामुळे खाद्यतेलाचे दर दबावात असल्याने त्याचाच परिणाम सोयाबीन दरावर झाल्याच्या शक्‍यतेतून खाद्यतेलावर आयात शुल्क लावण्यात आले. परंतु त्याचा कोणताच परिणाम सोयाबीन दरावर झाला नाही. सोयाबीन दरात तेजीसाठी शिल्लक २० लाख टन सोयापेंडची विल्हेवाट हाच एकमेव पर्याय आहे.
- पाशा पटेल, अध्यक्ष, महाराष्ट्र कृषिमूल्य आयोग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT