Agriculture Subsidy Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Interest Subsidy Scheme: व्याज सवलत योजनेस मुदतवाढ; शेतकऱ्यांना दिलासा

KCC Loan Farmer Relief: केंद्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अल्पमुदतीच्या ‘केसीसी’ कर्जावरील व्याज सवलतीच्या योजनेस मुदतवाढ दिली आहे. या योजनेमुळे देशातील ७.७१ कोटी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Team Agrowon

New Delhi News: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी यंदाच्या (२०२५-२६) आर्थिक वर्षासाठी सुधारित व्याज सवलत योजनेल मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ एक वर्षासाठी असून, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूदही करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे (केसीसी) अल्पमुदतीचे कर्ज कमी व्याजदराने दिले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. २८) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने व्याज सवलत योजनेच्या मुदतवाढीस मंजुरी दिली. त्यासाठी सरकारला १५,६४० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. या योजनेचा देशातील सुमारे ७.७१ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.

‘केसीसी’द्वारे, शेतकरी ७ टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. त्यामध्ये बँकांना १.५ टक्के व्याज अनुदान मिळते. वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ३ टक्क्यांपर्यंत प्रोत्साहन सवलत मिळते. म्हणजेच त्यांना फक्त ४ टक्के व्याज लागू होते. पशुपालन किंवा मत्स्यपालनासाठी घेतलेल्या कर्जावर २ लाख रुपयांपर्यंत व्याज सवलत लागू आहे.

वर्ष ‘केसीसी’द्वारे कृषी कर्ज

२०१४ ४.२६ लाख कोटी

२०२४ १०.०५ लाख कोटी

वर्ष एकूण कृषी कर्ज

२०१३-१४ ७.३ लाख कोटी

२०२३-२४ २५.४९ लाख कोटी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT