Dragon Fruit Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Dragon Fruit Rate : ड्रॅगन फ्रूटचे दर टिकून

Fruit Market : जुलैमध्ये अतिपावसाचा फटका ड्रॅगन फ्रूटच्या तिसऱ्या बहराला बसला, त्यामुळे या बहारातील ड्रॅगन फ्रूटची आवक मंदावली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : जुलैमध्ये अतिपावसाचा फटका ड्रॅगन फ्रूटच्या तिसऱ्या बहराला बसला, त्यामुळे या बहारातील ड्रॅगन फ्रूटची आवक मंदावली आहे. मात्र मागणी असल्याने दर टिकून आहेत. चौथ्या बहारात पोषक वातावणामुळे फूल कळी चांगली असून येत्या आठ दिवसांत ड्रॅगन फ्रूटची चौथ्या बहरातील फळे विक्रीला येणार आहेत.

गेल्या वीस दिवसांपासून दर टिकून असून सप्टेंबरपासून दरात वाढ होईल, अशी शक्यता ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ड्रॅगन फ्रूटचा हंगाम एक जूनपासून सुरू होतो. सर्वसाधारणपणे नोव्हेंबरअखेर ड्रॅगन फ्रूट बाजारपेठेत विक्रीस येते. तिसऱ्या बहरातील फळांची विक्री सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या बहरातील फळांना बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने उठावही झाला.

तिसऱ्या बहरातील फळे ऑगस्टमध्ये विक्रीला येतात. जुलैमध्ये अतिपाऊस झाला, या पावसामुळे तिसऱ्या बहराला फटका बसला. त्यामुळे फूल कळी निघण्यास अडचणी आल्या. परिणामी काही प्रमाणांत उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बाजारात ड्रॅगन फ्रूटची आवक मंदावली असल्याने मागणी वाढली असून दर स्थिर आहेत.

हंगाम सुरू झाल्यापासून आजअखेर अंदाजे १५०० टन ड्रॅगन फ्रूटची विक्री झाली. चौथ्या बहराला पोषक वातावरण असल्याने फूल कळी चांगली निघाली आहे. या बहरातील फळांची विक्री येत्या आठ ते दहा दिवसांत सुरू होईल.

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून ड्रॅगन फ्रूटचे दर टिकून आहेत. सध्या बाजारपेठेत लाल ड्रॅगन फ्रूटला ८० ते १२० रुपये प्रतिकिलो दर आहे. ऑगस्टपासून नोव्हेंबरपर्यंत या कालावधीत ड्रॅगन फ्रूटला मागणी अधिक राहून उठावही चांगला होतो. त्यामुळे येत्या काळात ड्रॅगन फ्रूटला उठाव राहणार असल्याने दर वाढण्याची शक्यता आहे.

यंदा हंगाम सुरू झाल्यापासून ड्रॅगन फ्रूटच्या दरात फारसे चढ-उतार झाले नाहीत. बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटची आवक कमी असल्याने दर टिकून आहेत. येत्या काळात दर वाढण्याची शक्यता आहे.
- महेश आसबे, ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकरी, वासुद अकोला (ता. सांगोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT