Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

MSP Procurement : सोयाबीन, मूग, उडीद खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता निश्चित

माणिक रासवे

Parbhani News : केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्यात यंदा (२०२४-२५ ) खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद खरेदीकरिता कृषी विभागाच्या पहिल्या अंदाजानुसार जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सहकारी पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत यंदा (२०२४-२५) राज्यात राज्य सहकारी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांच्या तर्फे सोयाबीन, मूग, उडदाची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. ‘नाफेड’ कार्यालयाने १९ जिल्ह्यांत १४६ खरेदी केंद्रांना तर ‘एनसीसीएफ’ कार्यालयाने ७ जिल्ह्यांतील ६३ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे.

राज्यात एकूण २०९ केंद्रांवर मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्याकरिता मंगळवार (ता. १) पासून शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. मूग, उडिदाची खरेदी गुरुवार (ता. १०) ते ७ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू राहील. सोयाबीनची खरेदी मंगळवार (ता. १५) ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत करण्यात येईल.

सोयाबीन, मूग, उडीद जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता (क्विंटलमध्ये)

जिल्हा...सोयाबीन...मूग...उडीद

छत्रपती संभाजीनगर...११.५०...६.२५...६.८०

जालना...१३.००...४.४०...५.५०

परभणी....१५.००...८.५०...७.५०

हिंगोली...१४.००...६.५०...७.००

नांदेड...१३.००...५.५०...६.००

लातूर...१२.३०...५.५०...६.१०

धाराशिव...१६.५०....७.००...७.४०

बीड...९.५०...५.५०...५.७०

बुलडाणा...१५.००...६.२०...६.४०

अकोला...१४.५०...४.२५...५.२५

वाशीम...१६.७०...५.८५...६.२५

अमरावती...१८.००...६.८०...६.७०

यवतमाळ...१४.३१...७.५५...६.८८

वर्धा...१२.००...५.००...५.४०

नागपूर...११.००...२.७८३३...३.२२४२

भंडारा...११.००...२.७९७७...३.१३६५

गोंदिया...०००....२.९६४०...०००

चंद्रपूर...१५.००....४.५०...४.५०

गडचिरोली...६.५६....२.९४...३.०४

नाशिक...१३.९५६०...५.९०...५.८५८०

धुळे....१४.५०....४.५०...३.७०

नंदुरबार...१४.९९८६...२.४८६०...३.७१

जळगाव...१०.००...३.००...३.५०

अहिल्यानगर...१९.००...८.०५...७.७५

पुणे...१३.००....४.५०...८.५०

सोलापूर...१२.२३५४...५.३६७५...६.०१९०

सातारा...२६.००....८.००...८.५०

सांगली...१९.०७...५.२२...६.४७

कोल्हापूर...२३.००...१०.५०...८.५०

ठाणे....०००...४.२०...९.२०

पालघर....०००...४.०२...६.५५

रत्नागिरी...०००....४.७६१७...४.७१४०

सिंधुदुर्ग....०००...५.१६१७...४.७४३२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : मराठवाड्यात पावसाने केली दाणादाण

Kolhapur Vegetable : कोल्हापूर बाजारात पावसामुळे भाज्यांची आवक मंदावली, दरात वाढ

Onion Seed Production : उत्तम बियाण्यांसाठी शास्त्रीय कांदा बीजोत्पादन

Soybean Market : सोयाबीनचे दर पाच हजारापर्यंत जातील का?

Indian Politics : रिश्ते नये, सोच वही !

SCROLL FOR NEXT