Devgad Hapus Mango Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Devgad Hapus Mango : देवगड हापूस आंबा मुंबईत दाखल

अस्सल चवीची ख्याती असलेल्या देवगड हापूस आंब्याचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आगमन झाले आहे.

Team Agrowon

Hapus Mango Market मुंबई : अस्सल चवीची ख्याती असलेल्या देवगड हापूस आंब्याचे (Devgad Hapus Mango) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Mumbai APMC) आगमन झाले आहे. राजापूर येथील गजानन शेटे यांच्या बागेतील मिनिस्टर ब्रँडचा हा आंबा आला असून, पेटीचा दर (Hapus Mango Rate) प्रतीनुसार सहा ते १२ हजार रुपये आहे. सध्या बाजार समितीत २०० ते २५० पेट्या दिवसाला दाखल होत आहेत.

यंदा हवामानातील बदलाचा मोठा परिणाम आंब्याच्या मोहरावर झाल्याने ऐन हंगामात म्हणजे एप्रिलमध्ये आंब्याचा तुटवडा जाणवणार असल्याचा अंदाज बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सध्या देवगड हापूसचे आगमन बाजारात झाले असले तरी जास्त दरामुळे तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाहीत. १५ फेब्रुवारीपासून आंबा जास्त प्रमाणात बाजारात येईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

यंदा उशिरा आलेली थंडी आणि धुक्यामुळे आंब्याच्या झाडांना उशिरा मोहर आला. पहिल्या मोहराचे आंबे काढणीला आले असून जानेवारीत जो मोहर येणे अपेक्षित होते तो मोहर आता फेब्रुवारीत येत आहे. परिणामी एप्रिलमध्ये काढणीला येणारा आंबा मे महिन्यांत काढणीला येण्याची शक्यता आहे.

उशिरा आलेल्या मोहराचा परिणाम आखाती देशांमध्ये रमजात महिन्यात आंबा निर्यातीचे नियोजन असलेल्या व्यापाऱ्यांना सहन करावा लागणार आहे.

यंदा २५ मार्च ते २५ एप्रिल रमजात महिना आहे. या दरम्यान आंब्याला मोठी मागणी असते. मात्र, ही मागणी पूर्ण करता येणार नाही, असेही व्यापारी सांगत आहेत.

एरवी मार्च एप्रिल आणि मे महिन्यात दिवसाला किमान ५० ते ६० हजार पेटी आंबा येतो. यंदा हे प्रमाण एप्रिल महिन्यात १० ते १५ हजार पेट्यांचे राहील असेही व्यापाऱ्यांना वाटते.

सध्या आलेला देवगड हापूस आंब्याच्या पेटीचा दर पाच ते १० हजार रुपये असून तीन हजार रुपये डझनाने विक्री होत आहे. मागील आठवड्यात हाच दर सहा ते १२ हजार रुपयांपर्यंत होता. आवक वाढेल तसा दरही कमी होत आहे.

कलिंगडाची मोठी आवक

सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगड, द्राक्षांची मोठी आवक आहे. दिवसाला ५५ वाहनांतून पाच हजार क्विंटलहून अधिक कलिंगडाची द्राक्षे येत आहेत.

मात्र, मागणीअभावी दर कमी आहे. क्विंटलचा दर कमीत कमी सातशे, तर जास्तीत जास्त १५०० रुपये मिळत आहे. तर साडे आठशे क्विंटलहून अधिक द्राक्षांची आवक आहे.

यंदाच्या हंगामात मे महिन्यात हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल असा अंदाज आहे. उशिरा आलेल्या मोहरामुळे एप्रिल महिन्यात कमी आंबा येईल. शिवाय याचा परिणाम निर्यातीवरही होणार आहे

संजय पानसरे, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT