Cashew Season Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Nut : ओल्या काजूगराला मागणी ; जर शेकडा १६०० ते १८०० रुपये

Cashew Market : हापूस आंब्यापाठोपाठ काजू पिकाला पावस परिसरात सुरुवात झाली आहे. ओल्या काजूगराला चांगली मागणी आहे.

राजेश कळंबटे

Ratnagiri News : हापूस आंब्यापाठोपाठ काजू पिकाला पावस परिसरात सुरुवात झाली आहे. ओल्या काजूगराला चांगली मागणी आहे. १६०० ते १८०० रुपये शेकडा दराने ओले काजूगर विकले जात असल्याने अनेक बागायतदारांनी काजूची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.

पावस परिसरात हापूस आंब्याच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. त्या पाठोपाठ काजूचे पीक भरू लागले आहे. ज्याप्रमाणे हापूस आंब्याला दर चांगला मिळत आहे, त्याप्रमाणे काजूच्या ओल्या गरांना चांगली मागणी वाढू लागली असून सध्या १६०० रुपये शेकडा दर मिळत आहे.

भविष्यात दर कमीजास्त होऊ शकतो. परंतु वानर, माकडांच्या अतिरिक्त वावरामुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे. सध्या शेतकरी या प्राण्यांपासून पीक वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून उर्वरित पीक व्यवस्थितरीत्या हाती येईल.

यासंदर्भात मावळंगे येथील शेतकरी अनिल बिर्जे म्हणाले, की स्वतःची जवळपास दोनशे आंबा कलमे आहेत. परंतु कोकण कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करूनही थ्रीप्स व तुडतुडे यावर प्रभावी कीटकनाशक देऊ शकलेले नाही.

जी कीटकनाशके मिळतात ती सामान्य शेतकऱ्याला न परवडणारी आहेत. म्हणून अनेक आंबा बागा मोहर येऊनही ओसाड दिसत आहेत. या बागायतदारांना माकड, वानरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून आम्ही शिल्लक जमिनीवर सुमारे पन्नास काजू कलमे लावली आहेत.

त्यातून आता उत्पादनाला सुरुवात झाली आहे. काजू बी तयार होऊन ती बाजारात विकणे न परवडणारे आहे. तोपर्यंत दर घसरलेले असतात. त्यामुळे ओले काजूगर विकणे परवडते. मेहनत घेऊन ओला काजूगर काढून विकला तर उत्तम दर मिळतो. त्याला चांगली मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Demand: पीक विम्यातील ‘ट्रिगर’ काढून पाठीत खंजीर खुपसला

Seed Germination Testing: दर्जेदार रोपांसाठी बियाण्यांची उगवणक्षमता, जोम महत्त्वाचा

Brown Biorefinery: शेतावरील ‘ब्राउन बायोरिफायनरी’

Farm Machinery Repair: प्रशिक्षण जमीन विकसन यंत्रांच्या देखभाल, दुरुस्तीचे

PM Kisan 23rd Installment: पीएम किसानचा २३ वा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT