Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : अपेक्षित दराअभावी कापसाच्या आवकेत घट

परभणी जिल्ह्यातील कापसाच्या प्रमुख बाजारपेठ असलेल्या मानवत, सेलू, परभणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जाहीर लिलावांद्वारे कापूस खरेदी सुरू आहे.

टीम ॲग्रोवन

परभणी ः परभणी जिल्ह्यातील कापसाच्या प्रमुख बाजारपेठ (Cotton Market) असलेल्या मानवत, सेलू, परभणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जाहीर लिलावांद्वारे कापूस खरेदी (Cotton Procurement) सुरू आहे. मागील आठवड्यापासून कापसाचे दर (Cotton Rate) ९००० रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. त्यामुळे कापसाची आवक कमी झाली आहे.

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा १४ नोव्हेंबर रोजी जाहीर लिलावांद्वारे कापूस खरेदी सुरु झाली. त्या वेळी कापसाला प्रतिक्विंटल किमान ८७०० ते कमाल ९५२१ रुपये दर मिळाले. परंतु त्यानंतर कापसाच्या दरात चढ-उतार होत आहेत.

सोमवारी (ता. ५) ते शनिवार (ता. १०) या कालावधीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ८५०० ते कमाल ८९५० रुपये दर मिळाले. या कालावधीत कापसाच्या ५० ते १५० गाड्यांची आवक झाली.

सेलू बाजार समितीत सोमवार (ता. ५) ते शनिवार (ता. १०) या कालावधीत कापसाला किमान ८५०० ते कमाल ८९९० रुपये दर मिळाले. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ५० ते ६० क्विंटल आवक होत आहे.

प्रतिक्विंटल किमान ८५०० ते कमाल ८७०० रुपये दर आहेत, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. दरात सुधारणा होऊन प्रतिक्विंटल किमान १० हजार रुपये दर मिळतील, या अपेक्षेने अनेक शेतकरी कापूस विक्रीस आणत नसल्याने आवक कमी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation Maharashtra : राज्यात ५ लाख एकर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

Kiwi Fruit Benefits: रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे किवी

Sugarcane Worker Registration: बीड जिल्ह्यात ५८४५ ऊसतोड कामगारांची नोंदणी पूर्ण

Rain Mango Damage: पूर्वमोसमीचा तडाखा; आंब्यासह भाज्या मातीमोल

SCROLL FOR NEXT