Banana Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Export : राज्यातून रोज ४० कंटेनर केळीची निर्यात

Banana Market : राज्यातून केळीची निर्यात वाढली आहे. सध्या रोज ४० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सुरू आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : राज्यातून केळीची निर्यात वाढली आहे. सध्या रोज ४० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सुरू आहे. निर्यातीच्या केळीला १५०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

सोलापुरातही प्रतिक्विंटल २००० ते २२०० रुपये दर आहे. केळीची काढणी वाढली असून आवक बऱ्यापैकी आहे. आंध्र प्रदेशातही मुबलक केळी आहे. तेथे केळीला १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

आंध्र प्रदेशातून रोज २० ते २२ कंटेनर केळीची निर्यात आखाती देशांत होत आहे. सोलापुरातून रोज १८ ते १९ कंटेनर केळीची निर्यात होत आहे. खानदेशात नंदुरबारातून सर्वाधिक १० ते ११ कंटेनर केळीची निर्यात होत आहे. तर धुळे (Dhule) व जळगाव जिल्ह्यांत मिळून रोज ११ ते १२ कंटेनर केळी निर्यात होत आहे.

सध्या खानदेशात केळीचे दर काहीसे टिकून आहेत. परंतु कमी दर्जाच्या केळीला १३०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. आगाप बागांमधून निर्यातक्षम केळीची आवक वाढली आहे. जशी उष्णता वाढेल, तशी आवकही वाढेल. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात केळीची आवक सध्या कमी आहे.

रावेर, यावल व मुक्ताईनगरात पुढे आवक वाढेल. यामुळे केळीची निर्यातही वाढेल. सध्या नंदुरबारातील शहादा येथून अधिकची केळी आखाती देशांत पाठविली जात आहेत. खानदेशात (Khandesh) काही शेतकरी गट व निर्यातदार कंपन्या युरोपातही केळी निर्यातीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासंबंधीची कार्यवाही सुरू असून, दरात पुढे किंचित वाढ होईल, असेही दिसत आहे.

आंध्र प्रदेशातील केळीला अडचण

आंध्र प्रदेशात केळीची आवक बऱ्यापैकी आहे. तेथून रोज १६ ते १७ कंटेनर केळीची निर्यात होत आहे. परंतु तेथे उष्णता वाढल्याने केळीत टिकवणक्षमता नाही. तेथे तापमान वाढत आहे. यामुळे निर्यातक्षम केळी कमी उपलब्ध होईल. यामुळे तेथे कार्यरत कंपन्या राज्यात निर्यातीसंबंधी केळीची खरेदी वाढवतील, असेही संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT