Khandesh Cotton Market Update Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : खानदेशात कापूस दर ७७०० ते ८००० रुपये

खानदेशात कापसाची खेडा खरेदी रखडत सुरू आहे. खरेदीदार सध्या कापसाची थेट किंवा जागेवर ७७०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी करीत आहेत.

Team Agrowon

Khandesh Cotton Market Update जळगाव ः खानदेशात कापसाची खेडा खरेदी (Cotton Kheda Kharedi) रखडत सुरू आहे. खरेदीदार सध्या कापसाची (Cotton Rate) थेट किंवा जागेवर ७७०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी (Cotton Procurement) करीत आहेत.

कापसाची आवक (Cotton Arrival) खानदेशात जेवढी डिसेंबरमध्ये होती, तेवढीच फेब्रुवारीतही राहिली आहे. मागील आठ ते १० दिवसांपासून प्रतिदिन सरासरी पाच हजार कापूस गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) कापसाची आवक खानदेशात होत आहे.

कापूस दरात सुधारणा होईल, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. कारण आठ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दरही कापसाला परवडत नसल्याची स्थिती आहे. खर्च प्रतिक्विंटल साडेचार ते पाच हजार रुपये असा आहे. यामुळे दरांची प्रतीक्षा आहे.

खानदेशात सुमारे ११३ जिनिंग प्रेसिंग कारखाने आहेत. यातील ५० कारखान्यांत कापसावर प्रक्रिया बऱ्यापैकी होत आहे. इतर कारखान्यांत प्रक्रिया व खरेदी कारखानदार टाळत आहेत.

कारण कारखानदारही बाजारातील अस्थिरतेमुळे सावध आहेत. गुजरातमधील कारखानदारही खरेदी करीत आहेत. ही खरेदी धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत बऱ्यापैकी आहे.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, अमळनेर, पारोळा भागांतही गुजरातमधील कारखानदारांचे एजंट खरेदी करीत आहेत.

दर्जेदार कापसाला खेडा खरेदीत कमाल ८००० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. तर कमी दर्जाच्या कापसाला ७६०० ते ७७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खरेदीदार देत आहेत.

खानदेशात यंदा सुमारे २२ लाख कापूसगाठींचे उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे. परंतु खरेदी रखडत सुरू आहे. अनेक शेतकरी विक्री टाळत आहेत. यामुळे कापूस प्रक्रियाही गतीने सुरू नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT