Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Price : कापूसदर दबावातच आवकेत वाढ

Cotton Market Update : खानदेशात कापूसदर दबावातच असून, खेडा खरेदीत किमान ५८०० व कमाल ६६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. दरात फारशी सुधारणा होत नसून, कापसाची आवक बाजारात मागील १५ ते २० दिवसांत वाढली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात कापूसदर दबावातच असून, खेडा खरेदीत किमान ५८०० व कमाल ६६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. दरात फारशी सुधारणा होत नसून, कापसाची आवक बाजारात मागील १५ ते २० दिवसांत वाढली आहे.

मकर संक्रांतीनंतर कापूसदरात वाढ होईल, अशी अपेक्षा अनेकांना आहे. सध्या खानदेशात रोज २८ ते ३० हजार क्विंटल कापसाची खेडा खरेदी किंवा थेट खरेदी केली जात आहे. खानदेशात बाजार समित्यांत कुठेही कापूस विक्रीसाठी येत नाही. खेडा किंवा थेट खरेदी केली जाते. कापूसदर सुरुवातीला कमी होते.

त्यात काहीशी वाढ झाली, पण पुढे दरवाढ झालेली नाही. यंदा कुणालाही खेडा खरेदीत सात हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर कापूस विक्रीसंबंधी मिळालेला नाही. मागील वर्षीदेखील दर कमीच होते. कापूस दरात सुधारणा दिसत नसल्याने मागील १० ते १२ दिवसांत अनेकांनी कापसाची विक्री केली आहे. कापूस उत्पादन यंदा कमी आहे. परंतु दरात वाढ नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

सध्या ढगाळ वातावरण आहे. यामुळे कापूस खरेदी रखडत सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक जिनिंग प्रेसिंग कारखानदार कापसाची खेडा खरेदी करून घेत आहेत. शासकीय खरेदीत विविध निकष असल्याने अनेक शेतकरी खेडा खरेदीत कापसाची विक्री करीत आहेत.

कापसाची आवक नोव्हेंबरमध्ये नीचांकी स्थितीत होती. त्या वेळेस प्रतिदिन पाच ते सहा हजार क्विंटल कापसाची आवक बाजारात होत होती. डिसेंबरमध्येही आवक कमी होती. परंतु डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात कापूस आवकेत वाढ झाली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT