Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : लागवड क्षेत्र-उत्पादकता कमी तरी कापूसदर दबावात राहण्याची शक्यता

Cotton Rate : कापसाचे क्षेत्र कमी झाले आहे त्याबरोबरच उत्पादकता कमी होणार आहे. त्यामुळे कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

Team Agrowon

Nagpur News : लागवड क्षेत्रात घट त्यबरोबरच संततधार पावसाच्या परिणामी पिकावर वाढता कीड-रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे कापसाची उत्पादकता देखील कमी होणार, अशी स्थीती आहे. मात्र त्यानंतर देखील अमेरिकन बाजारात कापसाचे दर दबावात असल्याने भारतीय बाजारातदेखील कापसाचे दर ६५०० रुपयांपर्यंत राहतील, अशी शक्‍यता शेतीप्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी व्यक्त केली आहे.

जावंधिया यांच्या माहितीनुसार, सध्या अमेरिकन कापूस बाजारात ‘आऊटलूक-अ’चा दर ७८.६० सेंट प्रतिपाऊंड रुई (२.२ पाऊंड = एक किलो) असा आहे. एक क्‍विंटल कापसापासून ३५ किलो रुई व ६४ किलो सरकी मिळते. ७९ सेंट प्रतिपाऊंड रुई व ३० रुपये प्रतिकिलो सरकी असा हिशेब आहे. १४६ रुपयांप्रमाणे ३५ किलो रुईचे ५११० रुपये तर ३० रुपयांप्रमाणे ६४ किलो रुईचे १९२० रुपये होतात.

त्यानुसार रुई, सरकीचे एकत्रित उत्पन्न ७०३० रुपये होते. त्यातून ५०० रुपयांचा प्रक्रिया खर्च वजा जाता ६५०० रुपये उरतात. त्यामुळेच कापसाचे दर ६५०० रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी कापसाला ७५०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे.

जागतिक बाजारातील मंदी लक्षात घेता शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा १००० रुपयांचा कमी दर मिळणार आहे. त्यामुळे शासनाला कापसाची हमीभावाने खरेदी करावी लागणार आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाचा उद्देश कसा साधता येईल, असा प्रश्‍नही जावंधिया यांनी उपस्थित केला आहे.

कापसाचे क्षेत्र कमी झाले आहे त्याबरोबरच उत्पादकता कमी होणार आहे. त्यामुळे कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. परंतु जागतिकस्तरावरील मंदीमुळे कापसाची मागणी कमी झाल्याने कापसाचे दर दबावात राहतील. यंदाच्या हंगामात कापसाला ६५०० रुपयांपेक्षा अधिकचा दर मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ७५०० रुपयांचा हमीभाव मिळावा याकरिता शासनाने हस्तक्षेप करण्याची गरज आहे.
- विजय जावंधिया, शेतीप्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT