Ethanol Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ethanol Price Hike: इथेनॉल दरात केंद्र सरकारकडून वाढ; साखर उद्योग मात्र निराश

Central Government Decision: केंद्र सरकारने इथेनाॅलच्या दरात वाढ करावी, अशी मागणी साखर उद्योगाने अनेक महिन्यांपासून लावून धरली होती. त्यानुसार केंद्र सरकारने आज सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किंमतीत प्रति लिटर १.३९ रुपयांची वाढ केली.

Anil Jadhao 

Pune News: केंद्र सरकारने इथेनाॅलच्या दरात वाढ करावी, अशी मागणी साखर उद्योगाने अनेक महिन्यांपासून लावून धरली होती. त्यानुसार केंद्र सरकारने आज सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किंमतीत प्रति लिटर १.३९ रुपयांची वाढ केली. मात्र सरकारने उसाचा रस आणि बी हेव्ही मोलॅसिसपासून तयार इथेनाॅलच्या दरात वाढ केली नाही. त्यामुळे साखर उद्योगाने नाराजी व्यक्त केली आहे. 

सरकारने मका आणि धान्यापासून निर्मित इथेनाॅलचे भाव जास्त ठेवले होते. त्यामुळे साखर उद्योगाकडून थेट उसाच्या रसापासून, बी हेव्ही मोलॅसीसीपासून आणि सी हेव्ही मोलॅसीसपासून निर्मित इथेनाॅलच्या दरात वाढ करण्याची मागणी केली जात होती. सरकारने अनेक महिन्यांपासून ही मागणी टाळली होती.

पण आज  सरकारने केवळ सी हेव्ही मोलॅसिसपासून निर्मित इथेनाॅलच्या दरात वाढ केली. नव्या निर्णयानुसार सी हेव्ही मोलॅसिसपासून निर्मित इथेनॉलची एक्स-मिल किंमत ५६.५८ रुपये प्रति लिटरवरून ५७.९७ रुपये असेल. या दराने इथेनॉल उत्पादक तेल कंपन्यांना इथेनॉलची खरेदी करू शकतील. नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५  या तेल विपणन वर्षासाठी ही किंमत लागू होईल. 

सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनाॅल मिश्रणाचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी सरकार देशात इथेनाॅल निर्मितीला चालना देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सी हेव्ही मोलॅसिपासून निर्मित इथेनाॅलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या इथेनॉलच्या किमतीत ३ टक्के वाढ केल्याने वाढीव मिश्रण लक्ष्य पूर्ण करण्यासाठी इथेनॉलची पुरेशी उपलब्धता होईल. किमतीच्या मंजुरीमुळे इथेनॉल पुरवठादारांना फायदा होईलच पण कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, परकीय चलनात बचत करणे आणि पर्यावरणाला फायदा होण्यास मदत होईल, असे केंद्राने म्हंटले आहे.

सरकारच्या या निर्णयावर साखर उद्योगाने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्राने थेट उसाच्या रसापासून व बी हेवी मॉलसेसपासून तयार झालेल्या इथेनॉलची किंमत वाढवणे अपेक्षित होते. मात्र या दोन्ही प्रकाराकडे दुर्लक्ष करत सी हेवीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत अल्प प्रमाणात वाढवली. प्रत्यक्षात थेट रसापासून आणि बी हेवी मोलॅसिसपासून इथेनाॅलची निर्मिती जास्त होते. सी हेवीपासून खूपच कमी प्रमाणात इथेनॉल तयार होते. त्यामुळे या दरवाढीचा विशेष फायदा इथेनॉल उत्पादकांना होणार नाही, असा सूर साखर उद्योगातून उमटत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT