Sugar Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Export : साखर निर्यातीबाबत केंद्राचे ‘वेट अँड वॉच’

Sugar Industry : सरता हंगाम पूर्ण संपल्यानंतर केंद्र सरकार जुलैला २०२३-२४ चे प्रत्यक्षातील उत्पादन व २०२४-२५ चे संभाव्य उत्पादन याचा आढावा घेईल.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : पुढील वर्षी साखर निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय जुलैनंतरच होण्याची शक्यता आहे. सरता हंगाम पूर्ण संपल्यानंतर केंद्र सरकार जुलैला २०२३-२४ चे प्रत्यक्षातील उत्पादन व २०२४-२५ चे संभाव्य उत्पादन याचा आढावा घेईल. यानंतर निर्यातीला परवानगी द्यायची की नाही याबाबत केंद्र अंतिम निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यंदाचे अंतिम साखर उत्पादन ३१० ते ३१५ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने ऊस लागवड घटली आहे. त्यामुळे जोपर्यंत पुढील हंगामाबाबत नेमकी माहिती येणार नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत निर्यातीच्या परवानगीबाबत कोणतीच घाईगडबड केली जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

यंदाचा हंगामात अनपेक्षितरित्या अंदाजापेक्षा साखर उत्पादन वाढले असले तरी प्रमुख राज्यातील ऊस लागवड घटल्याने पुढील वर्षी साखर उत्पादन घटीची शक्यता सरकारला चिंतित करीत आहे. यामुळे सरकार कोणत्याही परिस्थितीत निर्यातीला परवानगी देण्याची घाई करणार नाही. सरकारची यंदाच्या उत्पादनाबाबत खात्री पटत नाही, तोपर्यंत केंद्र सरकार कोणताही निर्णय घेणार नाही, असे केंद्रीय सूत्रांनी स्पष्ट केले.

साखर उद्योगातील अनेक संस्थांनी दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारला दहा लाख टन साखर निर्यातीची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. यंदा साखर उत्पादन वाढल्याचा दावाही करण्यात आला होता. पण केंद्राची सध्याची भूमिका पाहता निर्यातीचा निर्णय तातडीने होण्याची शक्यता धूसर बनली आहे.

पुढील हंगामाचे साखर उत्पादन होण्याअगोदर येणाऱ्या हंगामात अपेक्षित किती साखर उत्पादन होईल, याचा अंदाज केंद्र घेईल. यामध्ये स्थानिक बाजारात पुरेशी साखर व इथेनॉल प्रकल्पासाठी आवश्यक साखर याला प्राधान्य देण्यात येईल. यानंतरच निर्यातीच्या परवानगीबाबत विचार करण्यात येईल.

पुरेसा साठा, दर नियंत्रणालाच प्राधान्य

जागतिक बाजारात चांगले दर असले तरी आम्हाला साखरेची चणचण देशात भासू नये, या साठी प्राधान्याने प्रयत्न करावे लागतील. कोणत्याही परिस्थितीत साखर दराची अवाढव्य वाढ होणार नाही, त्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसू नये, याला आमचे प्राधान्य असेल.

यासाठी निर्यातीचा पर्याय आम्ही सरते शेवटी ठेवणार आहोत. जागतिक बाजारात दर असल्याने साखर उद्योगाची मागणी रास्त असली तरी पुरेशी साखर देशात राहणेही महत्त्वाचे आहे, असे ही केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या सूत्रांनी सांगितले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT