Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Export Policy : कांदा धोरणातील धरसोड थांबेना

Onion Market : कांदा निर्यात धोरणाचा सरकारने अक्षरशः पोरखेळ लावला असून निर्णयासंबंधी धरसोड सुरू आहे.

अनिल जाधव

Pune News : कांदा निर्यात धोरणाचा सरकारने अक्षरशः पोरखेळ लावला असून निर्णयासंबंधी धरसोड सुरू आहे. ‘‘सरकारने ५४ हजार ७६० टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. बांगलादेश, भूतान, मॉरिशस आणि बहरिन या चार देशांना ही निर्यात होणार आहे,’’ अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी गुरुवारी (ता. २२) दिली आहे.

गुरुवारी सायंकाळी रोहित कुमार सिंह म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने ५४ हजार ७६० टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. १८) बैठक झाली होती.

या बैठकीत कांद्याची मागणी करणाऱ्या देशांना सरकारच्या पातळीवर कांदा निर्यातीला परवानगी दिली होती. सरकार जेवढा कोटा देईल तेवढी निर्यात करण्याला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार सरकारने कांदा निर्यातीचा कोटा ठरवून दिला आहे.’’

परवानगी मिळालेला कांदा निर्यात करण्याला ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. म्हणजेच या तारखेपर्यंतच निर्यात करता येईल. विशेष म्हणजे कांदा निर्यातीवरील बंदीही ३१ मार्चपर्यंत आहे. पण सरकार निर्यातीची ही प्रक्रिया कशी राबवते, याची स्पष्टता अधिसूचना निघाल्यानंतरच येईल, असे निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी सांगितले.

दर काहीसे सुधारण्याची शक्यता

सध्या कांदा बाजारात सेंटिमेंटचा खेळ जोरात सुरू आहे. त्यामुळे सरकारने केवळ ५४ हजार ७६० टन कांद्याला निर्यातीसाठी परवानगी दिली असली तरी कांदा बाजारावर याचे परिणाम दिसू शकतात. कांदा भावात १०० ते २०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसू शकते, असे बाजारातील निर्यातदार आणि व्यापारी तसेच अभ्यासकांचे मत आहे.

चार देशांत निर्यात होणार

‘‘परवानगी मिळालेला कांदा चार देशांना निर्यात होणार आहे. त्यात बांगलादेश, मॉरिशस, बहरिन आणि भूतान या देशांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक निर्यात बांगलादेशला होईल. बांगलादेशला ५० हजार टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली. तर मॉरिशसला १२०० टन, बहरिनला ३ हजार टन आणि भुतानला ५६० टन कांदा निर्यात होईल,’’ असे सिंह यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT