Onion  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Onion Market : केंद्र सरकारने शनिवारी (ता.४) सकाळी निर्यातबंदी उठवल्याची अधिसूचना काढली. पण सरकारने निर्यातबंदी उठवताना निर्यात आणि कांदा भाव जास्त वाढणार नाही, याची काळजीही घेतली.

अनिल जाधव

Pune News : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर कांद्याच्या भावात आज ५०० ते ७०० रुपयांपर्यंत वाढ झाली. कांद्याचा भाव २ हजार रुपयांवर पोचला. पण कांदा भावात लगेच फार मोठ्या तेजीची शक्यता धुसरच आहे.

कारण सरकारने निर्यातबंदी उठवली असली तरी किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्काचा खुट्टा मारून ठेवला.

केंद्र सरकारने शनिवारी (ता.४) सकाळी निर्यातबंदी उठवल्याची अधिसूचना काढली. पण सरकारने निर्यातबंदी उठवताना निर्यात आणि कांदा भाव जास्त वाढणार नाही, याची काळजीही घेतली.

सरकारने अधिसूनेतच कांद्यावर प्रतिटन ५५० डाॅलर किमान निर्यात मूल्य (एमईपी) लावले. तसेच त्यावर ४० टक्के निर्यातशुल्क कायम आहे. म्हणजेच एमईपीच्या ४० टक्के शुल्क कांदा निर्यातीवर लागणार आहे.

हे शुल्क होते टनाला २२० डाॅलर. म्हणजेच कांदा निर्यातीसाठी आता टनाला ७७० डाॅलरचे निर्यातशुल्क लागणार आहे. रुपयात जर याचा हिशोब केला तर टनामागे किमान ६४ हजार २०२ रुपये दराने कांदा निर्यात होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT