Soybean MSP  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : ब्राझीलचे सोयाबीन उत्पादन कमीच

Soybean Production : चालू हंगामाच्या सुरुवातीपासूनच ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज सर्वांनी दिला.

अनिल जाधव

Pune News : चालू हंगामाच्या सुरुवातीपासूनच ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज सर्वांनी दिला.पण ब्राझीलचे सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा आहे, मात्र सोयाबीनचे भाव दबावात ठेवण्यासाठी विक्रमी उत्पादनाचे अंदाज दिले, असा आरोप ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी केला आहे. ब्राझीलचे सोयाबीन उत्पादन यंदा १ हजार ३५० लाख टनांवरच स्थिरावेल, असाही अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

आतापर्यंत सर्वच संस्थांनी ब्राझीलचे उत्पादन जास्त असल्याचे सांगितले. डिसेंबर महिन्यात काही भागात पावसाचा अंदाज ब्राझीलच्या हवामान विभागाने दिला आणि सोयाबीनचा बाजार पडला. सोयाबीनचा भाव अडीच वर्षातील निचांकी पातळीवर पोचला. ब्राझीलच्या कोनाब या सरकारी संस्थेच्या मते यंदा सोयाबीन उत्पादन १ हजार ५५० लाख टनांवर पोचणार आहे. तर युएसडीए म्हणजेच अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा १ हजार ५७० लाख टन उत्पादनाचा अंदाज दिला होता. ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादनाचे अंदाज कायम असल्याने सोयाबीनच्या भावावर जास्त परिणाम झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

या संस्थानी वाढीव सोयाबीन उत्पादनाचे जे अंदाज दिले त्यावरून नाराजी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, यंदा ब्राझीलच्या अनेक भागात कमी पाऊस आणि काही भागात जास्त पावसामुळे उत्पादन घटले. पण व्यापारी, सरकारसह इतर संस्था विक्रमी उत्पादनाचे अंदाज देत आहेत.

प्रत्यक्षात अशी परिस्थिती नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. ब्राझीलच्या उत्पादनाचे आकडे फुगवून सांगितले जात आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात पडले, असाही आरोप शेतकऱ्यांनी केला.

अनेक संस्थांनी प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात न घेताच जास्त उत्पादनाचे अंदाज दिले. यामुळे सोयाबीनचा भाव पडला. या संस्था आणि व्यापारी लाॅबी शेतकऱ्यांचा माल स्वस्तात घेण्यासाठी डाव खेळत असल्याचाही आरोप ब्राझीलमधील शेतकरी संघटनेने केला.

शेतकरी काय म्हणतात?

ब्राझीलमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अनेक दिवस पाऊस झाला नाही. याचा परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर झाला. तसेच ब्राझीलच्या मध्य आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये जास्त पाऊस झाला. त्यात माटो ग्रोसो, गोयास आणि माटो ग्रोसो डू सूल आणि इतर राज्यांमध्ये जास्त पाऊस पडला. यामुळे सोयाबीनच्या काढणीवरही परिणाम होत आहे. जास्त पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे जास्त नुकसान राहू शकते, असा अंदाज शेतकरी संघटनांनी काढला. तसेच ब्राझीलच्या दक्षिणेतील पराना सारख्या राज्यात सोयाबीन पेरणीच्या काळात जास्त पाऊस झाल्याचाही फटका बसला.

कुणाचे वाढीव अंदाज?

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की यंदा ब्राझीलमध्ये सोयाबीनचे उत्पादन १ हजार ३५० लाख टनांच्या दरम्यान आहे. म्हणजेच ब्राझीलच्या सरकारी संस्थेने जो अंदाज दिला त्यापेक्षा २०० लाख टनांनी आणि युएसडीएच्या अंदाजापेक्षा २२० लाख टनांनी उत्पादन कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी देशातील महत्वाच्या १५ सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पाहणी केली आणि त्याआधारे उत्पादनाचे अंदाज काढले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

Kharif Season Planning: निविष्ठांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी अचूक नियोजन करा : पालकमंत्री फुंडकर

Vidarbha Heat Wave: विदर्भातील तीन जिल्ह्यांत अति उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Banana Variety Selection: कमी पावसातील लागवडीसाठी केळीचा कंद निवडताना काय तपासावे?

SCROLL FOR NEXT