Jaggery Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Market : कोल्हापुरात गुळाच्या आवकेत मोठी घट

Jaggery Rate : गेल्या पंधरवड्यापासून उन्हामुळे गुऱ्हाळ बंद होण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : येथील बाजार समितीत गुळाच्या आवकेत घट झाल्याने दरात क्विंटलला शंभर रुपयापर्यंत वाढ झाली आहे. सध्या गुळाचा दर सरासरी ३६०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास आहे. संक्रांतीच्या दरम्यान गुळाचे दर चार हजार रुपयांवर गेले होते, पण त्यानंतर गूळ बाजार सावरला नसल्याची स्थिती आहे.

गेल्या पंधरवड्यापासून उन्हामुळे गुऱ्हाळ बंद होण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुळातच गेल्या वर्षीपेक्षा कमी संख्येने गुऱ्हाळे सुरू झाल्याने यंदा गुळाची आवक जेमतेमच होती, पण मागणीही नसल्याने ज्या प्रमाणात गुळाचे दर वाढणे अपेक्षित होते त्या प्रमाणात ते वाढले नाहीत.

पाडव्यापासून गुळाचे सौदे एक दिवसाआड होत आहेत. सध्या जिल्ह्यात हातावर मोजण्या इतपत गुऱ्हाळे सुरू आहेत. होळीपासून परप्रांतीय मजूर आपापल्या भागात गेल्याने सध्या सुरू असलेल्या गुऱ्हाळांवर स्थानिकच मजूर आहेत. कडक उन्हाळ्यामुळे गुऱ्हाळासाठी ऊस तोडणी करणे अशक्य बनत आहे. त्यामुळे गुऱ्हाळ मालकांनी गुऱ्हाळ बंद ठेवणे पसंत केले. याचा परिणाम गुळाच्या आवकेवर झाला.

यंदाच्या गूळ हंगामात संक्रांतीपर्यंत गुळाचे दर समाधानकारक होते. डिसेंबर व जानेवारीत गुळाची आवक चांगली असल्याने गुजरातमधील अनेक व्यापाऱ्यांनी शीतगृहासाठी थोडा थोडा खरेदी केला. यानंतर मात्र व्यापाऱ्यांनी अतिरिक्त खरेदी थांबविली. जितकी मागणी आहे तितक्याच गूळ खरेदीला प्राधान्य दिले. साहजिकच गूळ खरेदीसाठी स्पर्धा झाली नाही. त्याचा परिणाम गुळाच्या दरात वाढ न होण्यावर झाला.

प्रत्येक वर्षी पुढील हंगामासाठी गुळाची खरेदी होत असल्याने गूळ हंगामाच्या शेवटी गुळाचे दर चांगले वाढतात, असा अनुभव आहे. यंदा मात्र अपवाद वगळता अशी स्थिती नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गुळाची घटती आवक पाहून बाजार समिती प्रशासनाने पाडव्यापासून ही आवक एक दिवसाआड करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुळाची आवक कमी होत राहिली तर क्वचित प्रसंगी दोन दिवसाआड सुद्धा सौदे होऊ शकतात, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. काही प्रमाणात दर वाढले तरी अतिशय कमी प्रमाणात गूळ बाजार समितीत येत असल्याने या दरवाढीचा फायदा गूळ उत्पादकांना फारसा होणार नाही, अशी शक्यता आहे.

मुजरांकरून ऊस तोडणीला उन्हामुळे मर्यादा

वाढत्या उन्हाचा फटका कारखान्यांच्या ऊस तोडणी यंत्रणेला बसला, तसाच गुऱ्हाळघराच्या ऊस तोडणी यंत्रणेलाही बसला. काही ठिकाणी स्थानिक मुजरांकडून गुऱ्हाळ घरासाठी ऊस तोडणी सुरू आहे, पण यालाही उन्हामुळे मर्यादा येत असल्याची माहिती गूळ उद्योगातील सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT