Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : खानदेशात केळी दरात सुधारणा

Banana Market Rate : खानदेशात मागील दोन दिवसांत केळी दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची सुधारणा झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील दोन दिवसांत केळी दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची सुधारणा झाली आहे. प्रतिक्विंटल किमान ७५० आणि कमाल १३०० रुपये दर मिळत आहे. केळीची आवक स्थिर आहे.

उत्तर भारतात खानदेशातील केळीला उठाव वाढला आहे. सध्या खानदेशात रोज १९५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. सर्वाधिक आवक जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल व मुक्ताईनगर भागात होत आहे.

दर्जेदार केळीचे दर १३०० रुपयांवर आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही रोज १५५ ते १६० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. तेथेही कमाल दर १३०० रुपये प्रतिक्विंटल आहे.

मध्यंतरी खानदेशात केळी दरांवर मोठा दबाव होता. एप्रिलच्या मध्यापासून ते मे अखेरपर्यंत दर कमीच होते. या महिन्यातही सुरुवातीच्या पंधरवड्यात केळीचे दर किमान ४०० ते कमाल ९०० रुपये प्रतिक्विंटल होते.

काही खरेदीदार उधारीने व्यवहार करीत होते. कमी मागणी असल्याचे सांगून दरात फारशी वाढही खरेदीदारांकडून केली जात नव्हती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. परंतु मागील काही दिवसांत दरात सुधारणा झाली आहे.

दर्जेदार केळीचे दर १००० रुपयांवरून १३०० रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत. किमान दरही ५०० रुपयांवरून ७०० रुपये झाले आहेत. दर्जेदार केळीची आवक सध्या बाजारात होत आहे.

उत्तर भारतात केळीला उठाव बऱ्यापैकी आहे. तेथील खरेदीदार फैजपूर (ता. यावल), चोपडा, सावदा (ता. रावेर) आदी भागांतील एजंटच्या मदतीने केळीचा पुरवठा करून घेत आहेत. पंजाब, दिल्ली येथील मॉल्समध्ये दर्जेदार केळीला मागणी आहे. तसेच काश्मीरातही केळीला मागणी आहे.

सध्या आंध्र प्रदेश, गुजरात व मध्य प्रदेशात केळीची आवक सुरू आहे. पण ही आवक हळूहळू कमी झाली आहे. गुजरातमधील आवकेत घट झाल्याने खानदेशातील केळीला उत्तरेकडे काहीसा उठाव वाढला आहे. यामुळे दरात सुधारणा झाली आहे. केळीची आवक मात्र स्थिर आहे.

मागील महिन्यात प्रतिदिन सरासरी १९० ट्रक केळीची आवक खानदेशात झाली. या महिन्यातही एवढीच आवक राहील, असे दिसत आहे. राज्यात मुंबई, ठाणे, कल्याण, नागपूर तसेच छत्तीसगड, राजस्थान येथेही केळीला मागणी आहे. तेथेही केळीची जळगाव जिल्ह्यातून पाठवणूक केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT