Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market Rate : दरवाढीनंतर केळी दरात पुन्हा घसरण

Banana Market Update : खानदेशात केळीची आवक मागील पाच ते सहा दिवसांत आणखी वाढली आहे. ही आवक मागील दोन दिवस प्रतिदिन १८६ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात केळी दरात मागील आठवड्यात सलग दोन दिवस सुधारणा झाली. परंतु या आठवड्यात दरात क्विंटलमागे ६५० ते ७०० रुपये घसरण झाली असून, किमान दर ९०० तर कमाल दर १६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. बाजारात चिकू, आंब्यासह केळीची आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.

खानदेशात केळीची आवक मागील पाच ते सहा दिवसांत आणखी वाढली आहे. ही आवक मागील दोन दिवस प्रतिदिन १८६ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी आहे. मागील आठवड्यात केळीची आवक काहीशी घटली होती.

कारण तापमानात वाढ झाली. शिवाय त्या वेळेस उत्तर भारतातूनही मागणी बऱ्यापैकी आली. यामुळे सलग दोन दिवस केळी दरात क्विंटलमागे ५०० व २०० अशी ७०० रुपयांची वाढ झाली होती. परंतु या आठवड्यात मागील दोन दिवसांत पुन्हा दरांवर दबाव आला आहे.

बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारातही केळीची आवक मागील दोन दिवस अधिक राहिली. तेथील किमान दर ७०० रुपये व कमाल दर १२५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. तेथे आवक वाढल्याने लिलाव प्रक्रियादेखील रखडत सुरू आहे. रोज फक्त ३० ते ३५ मालवाहू वाहनांमधील केळीचे लिलाव होत आहेत. याचा परिणाम खानदेशतील बाजारावर होत आहे.

मागील आठवड्यात खानदेशात दर्जेदार केळीची खरेदी १९०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल या दरात अनेक खरेदीदारांनी केली. परंतु या आठवड्यात मागील दोन दिवसांत मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कारण रोज ४४ ते ४५ अंश सेल्सिअस कमाल तापमान आहे.

एवढ्या उष्णतेत केळीचा दर्जा टिकवून ठेवणे व इतर कार्यवाहीसाठी मोठा निधी, ऊर्जा खर्च होत आहे. त्यात दर कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. केळीची आवक मागील तीन दिवसांत १२ ट्रकने वाढली आहे.

आंध्र प्रदेश, गुजरातमधून आवक वाढू लागली

उत्तर भारतात पंजाब, दिल्ली, काश्मीर, हरियाना येथे केळीची पाठवणूक सुरू आहे. परंतु उत्तर भारतात आंध्र प्रदेश, गुजरातमधूनही केळीची पाठवणूक वाढली आहे.

गुजरातच्या तुलनेत खानदेशातून उत्तरेकडे केळीची पाठवणूक महाग पडते. खानदेशातून उत्तरेकडे केळी पाठवणुकीसाठी खरेदीदारांना १६ टनांच्या ट्रकमागे गुजरातच्या तुलनेत २० ते२५ हजार रुपये अधिकचे भाडे द्यावे लागते.

शिवाय रस्त्यांचे जाळे चांगले असल्याने गुजरातमधून उत्तरेकडे केळीची पाठवणूक गतीने करता येते. परिणामी खानदेशातून केळीचा उठाव कमी होतो, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT