Banana Market Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market Rate : खानदेशात केळी दरात घसरण

खानदेशात केळी दरात मागील १२ ते १५ दिवसांत सतत घट होत असून, कमाल दर २६०० रुपयांवरून २०५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत.

Team Agrowon

Jalgaon Banana Market Update : खानदेशात केळी दरात मागील १२ ते १५ दिवसांत सतत घट होत असून, कमाल दर २६०० रुपयांवरून २०५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. तर किमान दरही १६०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

आवकेत मोठी वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल व मुक्ताईनगरात केळीची प्रतिदिन आवक सध्या ८० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी झाली आहे. मागील महिन्याच्या मध्यापर्यंत खानदेशातील म्हणजेच तिन्ही जिल्ह्यांमधील एकूण आवक ९० ते ९२ ट्रक होती.

पण आता एवढी आवक जळगावमधील तीनच तालुक्यांतून होत आहे. खानदेशातील एकूण केळीची आवक सध्या १२५ ट्रकपर्यंत पोहोचली आहे. अर्थात आवकेत मागील २५ ते ३० दिवसांत वाढ झाली आहे. दर्जेदार केळी काढणीसाठी उपलब्ध आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही किमान दर ८७० व कमाल दर २००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. तेथेही केळीची मोठी आवक या महिन्यात होत आहे.

आवक वाढल्याने बाजारावर दबाव

खानदेशातील केळीला उत्तरेकडे मोठी मागणी असते. परंतु खरेदीदारांना वाहतुकीच्या दृष्टीने गुजरात, मध्य प्रदेशातील केळीची खरेदी परवडत आहे. तेथेही मुबलक व दर्जेदार केळी उपलब्ध होत आहेत. आवक वाढलेली असतानाच स्पर्धाही आहे. सध्या खानदेशातून रावेर, यावल व मुक्ताईनगर भागांतून काही खरेदीदार पंजाब, दिल्ली, काश्मीर येथे केळीची पाठवणूक करीत आहेत. उठाव चांगला आहे, पण आवक वाढल्याने बाजारावर दबाव आहे.

निर्यातीसही वेग

परदेशात केळीची निर्यात करण्यासाठी खानदेशात सध्या ११ निर्यातदार कंपन्या काम करीत आहेत. सध्या खानदेशातून रोज १५ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात होत आहे.

ही निर्यात वेगात व बऱ्यापैकी होत असून, निर्यातीच्या केळीचे दर २४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत. सर्वाधिक सहा ते सात कंटेनर केळी निर्यात जळगाव जिल्ह्यातून होत आहे. ही निर्यात आखातातील इराण, इराक, दुबई, बहरीन, कतर आदी देशांत कंपन्या करीत असल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT