Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : केळीची आवक स्थिर

Banana Rate : खानदेशात केळीची आवक मागील सात ते आठ दिवसांपासून स्थिर आहे. दर्जेदार केळीचे दरही दोन हजार रुपयांवर टिकून आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात केळीची आवक मागील सात ते आठ दिवसांपासून स्थिर आहे. दर्जेदार केळीचे दरही दोन हजार रुपयांवर टिकून आहेत. आवक मागील १२ ते १३ दिवसांत प्रतिदिन चार ट्रकने (एक ट्रक १६ टन क्षमता) वाढली आहे.

निर्यातक्षम केळी खानदेशात या महिन्यात काढणीवर आली आहे. कांदेबाग केळीची काढणी १०० टक्के पूर्ण झाली असून, आता मृग बहरातील केळीची आवक सुरू आहे. तसेच पिलबाग केळीमधूनही दर्जेदार केळी काढणीवर आली आहेत. मागील महिन्यात खानदेशात प्रतिदिन सरासरी ३० ट्रक केळीची आवक होत होती.

ही आवक मागील १२ ते १३ दिवसांत चार ट्रकने वाढून ३५ ट्रक झाली आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात केळीची आवक नीचांकी स्थितीत होती. या काळात निर्यातक्षम केळीही फारशी काढणीवर नव्हती. परंतु कमाल तापमानातील वाढ व थंडी काहीशी कमी झाल्याने केळीची आवक हळूहळू वाढली.

केळीची मागणी उत्तरेकडे काहीशी वाढली आहे. काश्मीर, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थानात केळीची पाठवणूक केली जात आहे. सध्या आगाप लागवडीच्या मृग बहर केळी बागांत केळी काढणीवर आली आहे. मृग बहर बागा जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धुळ्यातील शिरपूर भागात अधिकच्या काढणीवर आहेत.

कांदेबाग केळी रावेर, यावल, मुक्ताईनगर, शहादा, तळोदा भागात नव्हती. यामुळे खानदेशात डिसेंबर, जानेवारीत केळीची अल्प आवक झाली. केळीखालील कमाल क्षेत्रात मृग बहरातील बागा आहेत. यामुळे पुढे केळीची आवक वाढेल. सध्या दर्जेदार केळीला जागेवर किंवा शिवार खरेदीत २१३० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. कमी दर्जाची केळी फारशी नाही. परंतु या केळीसही ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

आखातातही पाठवणूक

खानदेशातून आखातातही केळीची पाठवणूक या आठवड्यात सुरू झाली आहे. जळगावातील यावल, मुक्ताईनगर, रावेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा भागातून सध्या प्रतिदिन तीन कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची पाठवणूक आखातात सुरू आहे. त्यासाठी विविध कंपन्यांनी खानदेशात काम सुरू केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT