Silk Cocoon Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Silk Market : गत आठवडाभरात आवक झालेल्या रेशीम कोषांना २७ हजार ते ४७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Jalna News : येथील बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी बाजारात रेशीम कोषांची आवक मंदावली आहे. गत आठवडाभरात आवक झालेल्या रेशीम कोषांना २७ हजार ते ४७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.

उन्हाच्या तीव्रतेचा फटका दुष्काळातही आश्‍वासक साथ देणाऱ्या रेशीम उद्योगाला बसताना दिसतो आहे. जालना रेशीम कोष खरेदी बाजारात गत आठवडाभरात सातत्याने कोष आवकेत झालेली घट ते स्पष्ट करताना दिसते आहे.

माहितीनुसार, २३ एप्रिलला जालना रेशीम कोष खरेदी बाजारात १० क्विंटल आवक झालेल्या रेशीम कोषांना २३ हजार ते ५० हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान तर ४७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

२४ एप्रिलला रेशीम कोषांचे आवक १० क्विंटल झाली. या रेशीम कोषांना २७ हजार ५०० ते ४६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान व सरासरी ३९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २५ एप्रिलला रेशीम कोषाची आवक १४ क्विंटल झाली.

या रेशीम कोषांना २६ हजार ५०० ते ४७ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान तर सरासरी ४१ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. २७ एप्रिलला केवळ ३ क्विंटल आवक झालेल्या रेशीम कोषांचे दर २९ हजार ते ३८ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान, तर सरासरी दर ३७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.

२९ एप्रिलला रेशीम कोषाची आवक घटून दोन क्विंटलवर आली. या रेशीम कोषांना १५ हजार ते ३८ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान, तर सरासरी २७ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ३० एप्रिलला पुन्हा रेशीम कोषांची आवक केवळ २ क्विंटल झाली. या रेशीम कोषांना १६ हजार ५०० ते ४७ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान तर ४२ हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT