Soybean Production
Soybean Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Production : शेतातच नाही, तर बाजारात येणार कुठून

टीम ॲग्रोवन

वर्धा: दिवाळी आता तोंडावर आली आहे. या काळात बाजार समितीत (APMC) मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक होते. यंदा मात्र तसे चित्र नाही. जिल्ह्यातील बाजार समितीत आलेली सोयाबीनची आवक (Soybean Arrival) नाममात्र आहे. अतिवृष्टीने (Heavy Rain) पीक गेल्याने शेतातच नाही बाजारात येणार कुठून असे चित्र निर्माण झाले आहे.

सध्या बाजारात असलेली आवक पाहता ती वाढेल असे वाटत आहे. विदर्भात नाव असलेल्या हिंगणघाट बाजार समितीत या काळात केवळ आठ हजार २०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. यात नवे कमी आणि जुनेच सोयाबीन अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

तर वर्धा बाजार समितीत केवळ ४८ पोते सोयाबीन आले आहे. याला मिळालेला भावही अत्यल्प आहे. अशा अवस्थेत येणारा उजेडाचा सण कसा साजरा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. खरिपाची पेरणी होताच जिल्ह्यात पावसाने थैमान घातले.

झालेला पाऊस अतिवृष्टी ठरला. अशी अतिवृष्टी एक नाही तर अनेक वेळा झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कपाशीची पिके वाहून गेली. काही भागातील शेती खरडून गेली. काही शेतात साचलेल्या पाण्यात असलेली पिके करपली.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीतून काही भागातील पिके बचावली. त्यातून काही उत्पन्न हाती येईल अशी अपेक्षा त्यांना होती. पण, त्यातच काही भागात आलेल्या पावसाने काढणी योग्य झालेले सोयाबीन ओले झाले. शिवाय रोज आकाशात जमत असलेले ढगही चिंता वाढवीत आहेत. अशात असलेले सोयाबीन काढून बाजारात आणावे कसे, आणले तर त्याला योग्य भाव मिळेल काय, ही वेगळीच चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.

साधारणतः अर्थशास्त्रानुसार माल कमी असताना दर अधिक असा नियम आहे. येथे मात्र केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हा नियम मोडीत निघत आहे. शेतमाल नसतानाही त्याचे दर पडत आहेत. केंद्राच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

- बाळा माऊस्कर, शेतकरी, माजी पंचायत समिती सदस्य, वर्धा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

Aquatic Ecosystem : कांदळवने : एक महत्त्वाची जलीय परिसंस्था

Healthy Ambadi : आरोग्यदायी पौष्टिक अंबाडी

SCROLL FOR NEXT