Silk Cocoon  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Silk Market : रेशीम कोषांची आवक जालना बाजारात घटली

Silk Cocoon : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या रेशीम कोष बाजारपेठेत गत काही महिन्यांपासून रेशीम कोषांची आवक घटली आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Jalna News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या रेशीम कोष बाजारपेठेत गत काही महिन्यांपासून रेशीम कोषांची आवक घटली आहे. व्यापाऱ्यांची कमी झालेली संख्या, उन्हाचा चटका या दोन्हीचा परिणाम आवकेवर होताना दिसत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदी सुरू करण्यात आली. तेव्हापासून अलीकडच्या काही दिवसापर्यंत रेशीम कोष खरेदी बाजारात राज्याच्या विविध भागातून तसेच राज्याबाहेरूनही शेतकरी रेशीम कोष विक्रीसाठी जालना बाजार समितीमध्ये येत होते. अलीकडच्या काही दिवसांपासून मात्र जालना रेशीम कोष खरेदी बाजारात शेतकऱ्यांची येण्याची संख्या तसेच कोषांची आवक घटली आहे.

माहितीनुसार, एप्रिल २०२३ ते २१ मार्च २०२४ पर्यंत जालना रेशीम कोष खरेदी बाजारात जवळपास ७ लाख ७५ हजार ३६४ किलो ९७४ ग्रॅम म्हणजे जवळपास ७ हजार ७५३ क्विंटल पेक्षा थोडी जास्त रेशीम कोषांची आवक झाली. या कोषांच्या खरेदीतून जवळपास ३३ कोटी ३८ लाख १५ हजार ३०१ रुपयांची उलाढाल झाली.

साधारणतः ४०० ते ४५० रुपये प्रतिकिलोचा सरासरी दर रेशीम कोषांना मिळाला. आधी साधारणतः ४० ते ५० शेतकरी आपला उत्पादित कोष जालना रेशीम कोष खरेदी बाजारात घेऊन यायचे. आता मात्र शेतकऱ्यांची ही संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. साधारणतः दहा ते वीस शेतकरीच आता कोष विक्रीसाठी घेऊन येताना दिसत आहेत. त्याचा थेट परिणाम आवकेवर झाला आहे.

बीडच्या बाजाराकडे व्यापारी वळाले

१५ ते २१ मार्च दरम्यान केवळ ६२ क्विंटल रेशीम कोषांची आवक झाली आहे. दुसरीकडे आठवडाभरात कोषांचा सरासरी दर ३६००० ते ४२ हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यानच राहिला. बीडच्या रेशीम कोष खरेदी बाजाराकडे व्यापारी वळल्याने काही प्रमाणात त्याचाही फटका जालना रेशीम कोष बाजारात येणाऱ्या आवकेवर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT