Pumpkin Arrival Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pumpkin Arrival : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर भोपळ्यांची मोठी आवक

मकर संक्रांत आठवडाभरावर आली असल्याने येथील आठवडा बाजारात ग्रामीण भागात संक्रांतीसाठी आवर्जून लागणाऱ्या भोपळ्यांची मोठी आवक झाली आहे.

Team Agrowon

मांगले, जि. सांगली : मकर संक्रांत (Makar Sankrant) आठवडाभरावर आली असल्याने येथील आठवडा बाजारात ग्रामीण भागात संक्रांतीसाठी आवर्जून लागणाऱ्या भोपळ्यांची मोठी आवक (Pumpkin Arrival) झाली आहे. कणेगाव (ता. वाळवा)येथील कृष्णात यशवंत निकम विक्रीसाठी आले होते.

संक्रांतीसाठी घराघरांत भोपळ्याच्या घाऱ्या ठरलेला मेनू असतो. या पार्श्वभूमीवर निकम यांनी कणेगाव येथे सुमारे एक एकर क्षेत्रावर भोपळ्याचे पीक घेतले आहे. त्यांनी केलेल्या एक एकर क्षेत्रातून त्यांना पंधरा टनाचे उत्पन्न मिळणार आहे. त्यापैकी त्यांनी पक्व झालेल्या भोपळ्यांची विक्री येथील आठवडा बाजारात केली. त्याला मागणीही मोठी होती.

भोपळ्याच्या आकारावर त्यांनी दर ठेवला होता. शंभर रुपया पासून एकशे पन्नास रुपयापर्यंत आकरानुसार भोपळ्याचे दर होते. अद्यापही त्यांच्या शेतात दहा ते बारा टनापर्यंत भोपळा शिल्लक आहे. कोणत्याही व्यापाऱ्याला भोपळा न घालता त्यांनी स्वत:च परीसरातील गावातून फिरून भोपळ्याची विक्री करीत आहेत.

याबाबत निकम म्हणाले,‘‘ग्रामीण भागात संक्रातीसाठी लागणा-या भोपळ्यांच्या पार्श्वभूमीवर आक्टोबर महिन्यात एक एकर क्षेत्रावर महिकोच्या बियाणाची लागण केली. तीन महिन्यानंतर तोडणी सुरू केली. ग्रामीण भागात संक्रातीला हमखास खायला मिळणारा पदार्थ घारी आहे. त्यामुळे भोपळ्याला मागणी आहे. आठवड्यात भोपळ्याची मोठी विक्री होईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT