Papaya Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Market : खानदेशात पपईची आवक रखडत

Papaya Arrival : खानदेशात रोपांची कमी उपलब्धता यासह इतर कारणांनी पपईची लागवड कमी झाली.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात रोपांची कमी उपलब्धता यासह इतर कारणांनी पपईची लागवड कमी झाली. परिणामी यंदा उत्पादन व आवकही कमी आहे. नियमित किंवा हंगामातील बागांमधूनही प्रतिकूल स्थितीमुळे आवक रखडत सुरू आहे.

पपईला उत्तर भारतात यंदा मागणी चांगली आहे. परंतु आवक कमी आहे. कमी उत्पादन असताना मध्यंतरी कमी दरांवरून वादंग झाले होते. परंतु धुळ्यातील शिरपूर बाजार समिती व शेतकऱ्यांनी मध्यस्थी करून दराचा तिढा दूर केला. सध्या पपईला जागेवर किंवा शिवार खरेदीत प्रतिकिलो निश्‍चित केलेला १९ रुपये दर मिळत आहे.

आवक मात्र यंदा मगील हंगामाच्या तुलनेत कमीच आहे. कारण कमी पाऊस व विषम वातावरणामुळे कमी उत्पादन येत आहे. खानदेशात पपईची सर्वाधिक पाच हजार हेक्टरवर लागवड नंदुरबारमधील शहादा तालुक्यात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर, धुळ्यात सुमारे दीड हजार हेक्टर व जळगाव जिल्ह्यात सुमारे दोन हजार हेक्टरवर पपईची लागवड झाली आहे.

जळगावातील लागवड पपई रोपांच्या तुटवड्यामुळे कमी झाली आहे. लागवड फेब्रुवारीत कमाल शेतकरी करतात. मार्चमध्ये लागवड पूर्ण होते. परंतु मागील वेळेस फेब्रुवारी व मार्चमध्ये रोपांचा तुटवडा होता.

यामुळे अनेक शेतकरी वेळेत लागवड करू शकले नाहीत. काहींना एप्रिलअखेर व मे मध्येदेखील लागवड करावी लागली. या उशिरा लागवडीच्या बागांतून उत्पादन कमी येत आहे. यामुळे आवक मागील महिनाभरापासून रखडत सुरू आहे.

ऑक्टोबरमध्येच दरवर्षी प्रतिदिन ५० ते ५५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) आवक सुरू होते. परंतु यंदा ही आवक ऑक्टोबरमध्ये प्रतिदिन सरासरी ३५ ट्रक एवढी होती. या महिन्यात आवक वाढली, परंतु ती ६० ट्रक प्रतिदिनपेक्षा अधिक नाही. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी ८५ ट्रक पपईची आवक झाली होती. तर दर प्रतिकिलो सरासरी १५ रुपये असे जागेवर मिळाले होते.

यंदा आवक कमी असल्याने दर टिकून आहेत. सुरुवातीला काहींना जागेवर ४० रुपये प्रतिकिलोचा दरही मिळाला. या महिन्यात सरासरी २० रुपये प्रतिकिलोचा दर राहील, असा अंदाज आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला २५ ते ३० रुपये प्रतिकिलोचा दर होता. सध्या १९ रुपये प्रतिकिलोचा दर आहे. या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ६० ट्रक पपईची आवक खानदेशात राहिली आहे. उशिरा लागवड झालेल्या बागांमध्ये पुढील महिन्यात आवक वाढू शकते, असाही अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT