Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : हिंगोलीतील बाजारांत नवीन सोयाबीनची आवक

Soybean Rate : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारांमध्ये (भुसार माल मार्केट) यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारांमध्ये (भुसार माल मार्केट) यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता. ५) सोयाबीनची ६३० क्विंटल आवक होती.

सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४३५० ते कमाल ४६०० रुपये तर सरासरी ४४७५ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात लवकर पेरणी केलेल्या सोयाबीनची सुगी सुरू आहे. स्थानिक परिसरातील शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात घेऊन येत आहेत.

हिंगोली येथील धान्य बाजारात शनिवारपासून (ता. ३०) नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. बुधवारी (ता. ४) सोयाबीनची ३५५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विटंल किमान ४३०० ते कमाल ४६३५ रुपये तर सरासरी ४४६७ रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता. ३) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४४०५ ते कमाल ४६४० रुपये तर सरासरी ४५२२ रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. ३०) सोयाबीनची ३६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४५०५ ते कमाल ४७९१ रुपये तर सरासरी ४६४८ रुपये दर मिळाले.

आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याचे कारण सांगत व्यापारी नवीन सोयाबीनची कमी दराने खरेदी करत आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT