Flower Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Flower Market : दसऱ्यानिमित्त दोन दिवस झेंडूची आवक वाढणार

Marigold Flower Rate : विजयादशमीसाठी (दसरा) विशेष मागणी असलेल्या झेंडूच्या फुलांची राज्याच्या विविध भागांतून पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२२) पहाटेपासून आवक सुरू झाली आहे.

गणेश कोरे

Pune News : विजयादशमीसाठी (दसरा) विशेष मागणी असलेल्या झेंडूच्या फुलांची राज्याच्या विविध भागांतून पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२२) पहाटेपासून आवक सुरू झाली आहे.

सोलापूर, उमरगा, भूम, परांडा, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव, सातारा, वाई आदी भागांमधून मोठी आवक होत आहे. ही आवक पुढील दोन दिवस मंगळवार (ता.२४) पर्यंत सुरू राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, फुलांचे उत्पादन दर आणि आवकेबाबत बोलताना शेतकरी सागर फडतरे (रा. निंबोरे, ता. करमाळा) म्हणाले,‘‘दसरा आणि दिवाळीचे नियोजन करून दोन एकर झेंडूची लागवड केली आहे. काढणीला सुरवात केली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माझी आणि गावातील सुमारे १५० क्रेट फुले विक्रीसाठी आणली आहेत. दर ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो मिळत आहेत. यावर्षी परतीच्या पावसाने फटका न दिल्याने नुकसान झाले नाही.

त्यामुळे यंदा उत्पादन आणि फुलांचा दर्जा चांगला आहे. पण, दर कमी आहेत. गेल्यावर्षी हेच दर ७० रुपयांपर्यंत होते. दिवाळीत चांगले दर मिळतील, अशी आशा आहे.’’

कलकत्ता गोंड्याला प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दर

पुणे बाजार समितीत झेंडूच्या फुलांची आवक क्रेट आणि गोण्यांमधून आवक होत होती. यावेळी शिवनेरी रस्त्‍याच्या दुतर्फासह भुसार बाजार आवार आणि ट्रक पार्किंगमध्ये विक्रीची सोय करण्यात आली होती. यावेळी कलकत्ता गोंड्याला ३० ते ४० तर इतर झेंडूला १० ते ३० रुपये प्रतिकिलो दर होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT