Soybean Market News
Soybean Market News Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनामुळे बाजारात चढ उतार

Anil Jadhao 

Soybean Market News: जगातील सर्वात मोठ्या सोयापेंड (Soya meal) आणि सोयातेल निर्यातदार अर्जेंटीनात (Soya oil exporter Argentina) यंदा दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर (Soybean Rate) वाढलेले आहेत.

पण या आठवड्यात अर्जेंटीनातील (Argentina Agricultural) काही भागांमध्ये पाऊस पडला. त्यामुळे सोयाबीन पिकाला काहीसा आधार मिळाला (Soybean Crop) आहे. पण तरीही अर्जेंटीनातील उत्पादनातील घट कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अर्जेंटानातील सोयाबीन पिकानं यंदा आंतरराष्ट्रीय बाजाराला अनेकदा आपल्या तालावर नाचवलं. सुरुवातीला अर्जेटीनात विक्रमी उत्पादनाचा अंदाज होता.

त्यामुळं सोयापेंड आणि सोयातेलाचा बाजार स्थिर होता. त्यानंतर मात्र अर्जेंटीनातील सोयाबीन पिकाला दुष्काळाचा फटका बसला. सरुवातीला अर्जेंटीनात ५१० लाख टन सोयाबीन उत्पादन होईल, असा अंदाज होता.

त्यानंतर त्यात कपात करण्यात आली. जानेवारीच्या अहवालात युएसडीएनं ४५५ लाख टन उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला.

अर्जेंटीनात यंदा सोयाबीन पिकाला दुष्काळाचा फटका बसला. त्यामुळे अर्जेंटीनातील उत्पादन कमी होण्याचे अंदाज व्यक्त होत आहेत. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर होत आहे.

अर्जेंटीना सोयापेंड उत्पादनात तिसऱ्या स्थानावर असला तरी सोयाबीन उत्पादनात आघाडीवर आहे. अर्जेंटीनातून थेट सोयाबीन निर्यात खूपच कमी होते.

येथे सोयाबीन प्रक्रिया उद्योग चांगलाच विस्तारला असून गाळपाची क्षमता जास्त आहे. त्यामुळे अर्जेंटीनातून सोयापेंड आणि सोयातेल निर्यात होत असते.

भारत अर्जेंटीनाकडून सोयातेलाची आयात करतो. तर चीनसह इतर देश सोयापेंड आयात करतात. अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात घटणार आहे.

त्यामुळे सीबाॅटवर सोयापेंड दरानं ४८५ डाॅलरचा टप्पा गाठला होता. तर सोयाबीनचे भाव १५.४७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर यंदा सोयापेंड दर तेजीतच राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

काही भागांमध्ये पाऊस

मागील चार दिवसांमध्ये अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादक भागात पाऊस झाला. अर्जेंटीनातील सोयाबीन पीक सध्या दाणे भरण्याच्या स्थितीत आहे.

त्यामुळे आता पडलेल्या पावसाचा फायदा सोयाबीन पिकाला होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर जाणवला होता. सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे कमी झाले होते.

पावसामुळे उत्पादन वाढेल का?

अर्जेंटीनात पाऊस पडला पण उशीर झाला. त्यामुळे उत्पादनात घट येणारच आहे. युएसडीए फेब्रुवारीच्या अहवालातही अर्जेंटीनातील उत्पादन कमी करू शकते, असा अंदाज आहे.

तर अर्जेंटीनातील उत्पादन घटेल, हे बाजाराने आधीच गृहित धरले आहे. त्यामुळेच सोयाबीन आणि सोयापेंडचे दर वाढलेले आहेत, असे बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT