Amul Milk Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Milk Rate : ‘अमूल, मदर डेअरीकडून दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ

देशातील सर्वांत मोठा डेअरी ब्रँड असणाऱ्या ‘अमूल’ने सर्व दुधाच्या विक्री दरात २ रुपयांनी वाढ केली आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : देशातील सर्वांत मोठा डेअरी ब्रँड असणाऱ्या ‘अमूल’ने (Amul Milk Rate) सर्व दुधाच्या विक्री दरात (Milk Sale Rate) २ रुपयांनी वाढ केली आहे. तसेच मदर डेअरनेही (Mother dairy) दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ केली आहे.

गुजरात, दिल्ली-एनसीआर, पश्‍चिम बंगाल, मुंबई यासह सर्व इतर बाजारपेठांमध्ये ही वाढ लागू असेल. नवीन दर आज (ता.१७) पासून लागू होतील.

या दरवाढीनुसार, अमूल गोल्डची किंमत ५०० मिलिसाठी ३१ रुपये, अमूल ताजा ५०० मिलिसाठी २५ रुपये आणि अमूल शक्ती ५०० मिलिसाठी २८ रुपये असेल. दूध उत्पादन व प्रक्रिया खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ करत असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दूध उत्पादकांचा एकूण खर्च वाढल्याने गेल्याच वर्षी ‘अमूल’ने दूध उत्पादकांना आठ ते नऊ टक्के दरवाढ दिली होती. दूध उत्पादनांपासून पॅकिंगपर्यंतच्या सगळ्याच खर्चात मोठी वाढ झाल्याने विक्री खर्चात वाढ करावी लागत असल्याचे ‘अमूल’ने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT