Wheat Market Rate News Agrowon
ॲग्रोमनी

Wheat Market : गव्हाचे दर हमीभावापेक्षा जास्त राहतील का?

देशातील गहू उत्पादन यंदा वाढेल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला. पण यंदा गहू पिकाला वाढलेली उष्णता आणि वादळी पावसाचा फटका बसत असल्याने उत्पादन यंदा कमीच राहील.

अनिल जाधव

अनिल जाधव

पुणेः देशातील गहू उत्पादन (Ginger Production) यंदा वाढेल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला. पण यंदा गहू पिकाला (Wheat Crop) वाढलेली उष्णता आणि वादळी पावसाचा फटका बसत असल्याने उत्पादन यंदा कमीच राहील.

तर गव्हाचे दर (Wheat Rate) हमीभावापेक्षा जास्तच राहतील, असा अंदाज व्यापारी आणि उद्योग व्यक्त करत आहेत. 

सरकारने खुल्या बाजारात गहू विक्री केल्यानंतर दर नरमले. पण अद्यापही हमीभावापेक्षा जास्तच आहेत. पण सरकारने खुल्या बाजारात गहू विकल्याने सरकारकडील साठा घटला.

सध्या सरकारकडे गव्हाचा साठा गेल्यावर्षीपेक्षा जवळपास निम्मा आहे. साठा कमी असल्याने यंदा सरकारने ३४३ लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवले आहे.

पण सरकारला यंदाही उद्दीष्ट साध्य करता येणार नाही, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

चालू हंगामात देशात १ हजार १२० लाख टन गहू उत्पादन होईल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला. पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील उष्णतेचा फटका पिकाला बसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

बदलत्या वातावरणाचा उत्पादकतेवर परिणाम होत असल्याचे सांगत असले तरी कृषी विभागाने मात्र पीक चांगलं असल्याचं सांगितले. 

मध्य प्रदेशातील जवळपास ४० टक्के गव्हाची काढणी पूर्ण झाली. पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील वाढलेल्या उष्णतेचा गहू उत्पादकतेवर परिणाम झाल्याचे दिसत नाही, असे कृषी विभागाने सांगितले.

केंद्रीय कृषी विभागाने गहू पिकाची स्थिती चांगला असल्याची माहिती दिली. पुढील तीन दिवस महत्वाच्या गहू उत्पादक राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

पण या पावसाचा किंवा ढगाळ वातावरणाचा पिकाला फटका बसणार नाही, तर उष्णता कमी राहून पिकाला फायदाच होईल, असे मत कृषी विभागाने व्यक्त केले. 

पुढील काही दिवसांमध्ये देशातील बाजारात गव्हाची आवक वाढेल. पण सध्या बहुतेक बाजारांमध्ये गव्हाचे दर हमीभावापेक्षा जास्त आहेत.

गव्हाचे दर हमीभावापेक्षा १०० रुपयाने जास्त राहिले तरी सरकारला हमीभावाने खरेदी वाढवणे अवघड होईल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

व्यापारी आणि जाणकारांनी यंदा देशात १  हजार ते १ हजार ५० टन गहू उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. तसचं खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा जास्तच राहील, असाही अंदाज व्यक्त केला.

सरकारला यंदा ३४३ लाख टन गहू खरेदी करायचा म्हटल्यास हमीभावापेक्षा जास्त दर द्यावा लागेल. असे झाल्यास गहू दराला आणखी आधार मिळेल, असाही अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT