Tur Rate  Agrowon
ॲग्रोमनी

Tur Market : तूर यंदा ९ हजारांचा टप्पा गाठेल का?

तुरीच्या दरात मागील आठवड्यापासून काहिशी सुधारणा झाली. आजही तुरीच्या दरात क्विंटलमागं सरासरी १०० रुपयांपर्यंत वाढ झाली होती.

Anil Jadhao 

Tur Market Update : देशात सध्या तुरीचे भाव (Tur Rate) तेजीत आहेत. यंदा देशातील उत्पादन घटलं. तर आयातही (Tur Import) सरकारच्या उद्दीष्टापेक्षा कमी राहणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दरवाढीची (Tur Rate) अपेक्षा आहे. परिणामी सध्या तुरीची विक्री कमी करताना दिसत आहेत.

त्यामुळं बाजारातील तूर आवकेचा (Tur Arrival) दबाव कमी झाल्यानंतर दर ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात सध्या तुरीची आवक कमी आहे. तुरीची अनेक भागांमधील काढणी आता पूर्ण होत आहे. तर बहुतांशी भागातील काढणीची कामं वेगानं सुरु आहेत. तुरीला सध्या चांगाल भाव मिळतोय. त्यातच यंदा उत्पादन घटल्यानं दर वाढू शकतात, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

त्यामुळं शेतकरी तुरीची कमी प्रमाणात विक्री करत आहेत. परिणामी सध्या बाजारातील आवक कमी आहे. पण दुसरीकडं उद्योगांकडून तुरीची खरेदी सुरु आहे. तुरीला उठाव असल्यानं दरात वाढ पाहयला मिळाली.

तुरीच्या दरात सुधारणा

तुरीच्या दरात मागील आठवड्यापासून काहिशी सुधारणा झाली. आजही तुरीच्या दरात क्विंटलमागं सरासरी १०० रुपयांपर्यंत वाढ झाली होती. सध्या गुणवत्तेच्या तुरीला सरासरी ८ हजार ४०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. पण सद्या बाजारात येणाऱ्या तुरीमध्ये हे प्रमाण कमी आहे.

तर मागील आठवड्यापासून बाजारात तुरीला सरासरी ७ हजार ३०० ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. तुरीचे भाव वाढल्यानं शेतकऱ्यांना आणखी दर सुधारण्याची आशा आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी तुर मागं ठेवली.

तुरीचा पुरवठा कमीच राहणार

सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. यामुळं दर वाढले. तर बाजारात तुटवडा असल्यानं उठाव मिळतोय. परिणामी दर तेजीत आहेत. यंदा देशातील तूर उत्पादन घटलं. तुरीचं उत्पादन यंदा ३० लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज व्यापारी आणि उद्योग व्यक्त करत आहेत.

मात्र सरकारनं ३६ लाख टनांचा अंदाज व्यक्त केला. तर यंदा सरकारचं १० लाख टन आयातीचं उद्दीष्ट आहे. पण एवढी तूर आयात करता येणार नाही, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

दरवाढीची अपेक्षा

भारताला दरवर्षी ४५ लाख टन तुरीची गरज असते. तर यंदा तुरीचा एकूण पुरवठा गरजेपेक्षा कमीच राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळं तुरीचे दर तेजीत राहतील. तुरीला सध्या ७ हजार ३०० ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.

बाजारात तुरीची आवक वाढली तरी हा भाव टिकून राहू शकतो. तर आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर तुरीचे भाव ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच टप्प्याटप्प्यानं तुरीची विक्री करावी, असं आवाहन तूर बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT