Chana Market  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Market : हरभरा बाजारातील चित्र दलणार की नाही?

Chana Rate : मागील तीन ते चार दिवसांपासून बाजारातील आवक काहीशी वाढत आहे. हरभरा बाजार हंगामाच्या सुरुवातीपासूनच दबावात दिसतो.

Anil Jadhao 

Chana Procurement : देशातील बाजारात मागील दीड वर्षापासून हरभरा दराने हमीभावाचा टप्पाही गाठला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. मे महिना संपत आला, नाफेडची खेरदीही चांगली झाली, पुढील हंगामावर एल निनोचे सावट दिसत आहे. तरीही हरभरा भाव ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.

शेतीमाल बाजारात सध्या एल निनोची चर्चा सुरु आहे. विविध संस्थांनी एल निनोचा परिणाम माॅन्सूनवर होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला. यामुळे खरिपापेक्षाही रब्बी हंगामाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

पण असे असतनाही रब्बीतील मुख्य कडधान्य पीक असलेल्या हरभऱ्याचे भाव दबावातच आहेत. सध्या हरभऱ्याला हमीभावापेक्षा ४०० ते ८०० रुपये कमी भाव मिळत आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून बाजारातील आवक काहीशी वाढत आहे. हरभरा बाजार हंगामाच्या सुरुवातीपासूनच दबावात दिसतो. मागील दीड वर्ष हरभरा दराने हमीभावाचा टप्पा गाठला नाही. त्यामुळे हंगामात शेतकरी नाफेडच्या विक्रीलाच पसंती देत आहेत.

नाफेडच्या खेरदीची गतीही कमी झाली. नाफेडने मंगळवारपर्यंत २० लाख ६५ हजार टनांची खरेदी केली. नाफेडच्या खरेदीत मध्य प्रदेशची आघाडी कायम आहे.

मध्य प्रदेशात ७ लाख २७ हजार टनांची खरेदी झाली. तर महाराष्ट्रात ६ लाख ९६ हजार टन हरभरा नाफेडला विकला गेला. म्हणजेच केवळ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातच १४ लाख टनांपेक्षा जास्त खरेदी झाली. नाफेडची खरेदी यंदाही चांगली झाली. पण खुल्या बाजाराला आधार मिळाला नाही. खुल्या बाजारात हरभरा भाव हंगामाच्या सुरुवातीपासूनच ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.

नाफेडने मागील हंगामात स्टाॅकमधील हरभरा नंतर टप्प्याटप्प्याने बाहेर काढून दर दबावात ठेवले होते. यंदाही सरकार असेच करू शकते, अशी भीती व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे चालू भाव हमीभावापेक्षा कमी असले तरी स्टाॅकीस्ट जास्त सक्रीय दिसत नाहीत. परिणामी बाजार दबावातच दिसतो.

पुढील काळात हरभरा बाजार माॅन्सूनचा पाऊस आणि सरकारच्या धोरणावर अवलंबून असेल, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT