Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market: कापूस बाजारावर दबाव का वाढला?

एप्रिल महिना संपला तरी कापसाच्या दरात शेतकऱ्यांना अपेक्षित तेजी आली नाही. आजही कापसाचे भाव दबावातच आहेत.

Anil Jadhao 

Cotton Rate Update : एप्रिल महिना संपला तरी कापसाच्या दरात शेतकऱ्यांना अपेक्षित तेजी आली नाही. आजही कापसाचे भाव दबावातच आहेत. उलट दोन आठवड्यांमध्ये कापूस दरात झालेली वाढही कमी झाली. सरकी आणि खाद्यतेल बाजारातील नरमाईचा कापसावर परिणाम झाल्याचं सांगितलं जातं.

देशातील बाजारात आजही कापसाच्या दरात नरमाई कायम होती. आज कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ७०० ते ८ हजार २०० रुपयांचा दर मिळाला. बाजारात केवळ कापसाच्या दरातच नाही तर सरकी आणि सरकी पेंडेच्या दरातही नरमाई आहे.

पशुखाद्यात सरकी पेंडेला मागणी आहे. पण खाद्यतेलाचे दर पडल्याचाही दबाव आहे. सरकीचे दर आज ३ हजार २०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सरकीच्या भावात तीन आठवड्यांमध्ये ३०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

बाजारात मागील महिनाभरापासून सरासरी १ लाख २० हजार गाठींची आवक होत आहे. एप्रिल महिन्यातील कमाल आवक १ लाख ४५ हजार गाठी होती. मागील चार दिवसांमध्ये महत्वाच्या कापूस उत्पादक पट्ट्यात पाऊस होत आहे. त्यामुळे कापसाच्या आवकेवर काहीसा परिणाम झाला. चार दिवसांपासून आवक काहीशी कमी दिसते.

पण पाऊस उघडल्यानंतर कापसाची आवक कायम राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस कापसाची आवक जास्त राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बाजार समित्यांमसोबतच वाद्यांमध्येही कापसाचे भाव नरमले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी कापसाचे वायदे ८०.६२ सेंट प्रतिपाऊंडवर होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चढ उतार दिसत आहेत. देशातील वायदेही नरमले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जून महिन्याचे कापसाचे वायदे ६२ हजार ८६० रुपये प्रतिखंडीवर होते. एक खंडीमध्ये ३६० किलो रुई असते.

बाजारात कापसाचे दर नरमल्याने शेतकऱ्यांचा पुन्हा हिरमोड झाला. जास्त दिवस थांबू शकत नाहीत, असे शेतकरी कापूस विकत आहेत. तसचं पुढील काही दिवस कापसाची आवक जास्त राहू शकते. मात्र त्यानंतर कापसाची आवक कमी होत जाईल.

कारण शेतकऱ्यांकडील कापसाचा स्टाॅकही कमी होत आहे. कापसाची आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज जाणकार आणि उद्योगांकडूनही व्यक्त केला जात आहे. पण शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करताना बाजाराचा आढावा घ्यावा. तसचं विक्री करण्यापूर्वी बाजारातील दराची शहानिशा करावी, असं आवाहनही जाणकारांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT