Turmeric Agrowon
ॲग्रोमनी

Turmeric Market : हळदीचे भाव काही दिवसांपासून का स्थिरावले?

Turmeric Rate : देशातील हळदीचे दर मागील काही दिवसांपासून काहीसे स्थिर दिसत आहेत. वायदे आणि बाजार समित्यांमध्ये भावात चढ उतारही दिसून येत आहेत.

Anil Jadhao 

Turmeric Price : देशातील हळदीचे दर मागील काही दिवसांपासून काहीसे स्थिर दिसत आहेत. वायदे आणि बाजार समित्यांमध्ये भावात चढ उतारही दिसून येत आहेत. यंदा हळदीचे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र देशांतर्गत आणि निर्यातीसाठी हळदीला चांगली मागणी आहे. मग पुढील काळात हळदीचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. 

चालू हंगामात वाढलेली निर्यात आणि कमी पुरवठा यामुळे हळदीच्या दरात चांगलीच तेजी आली होती. पण वाढलेल्या भावात निर्यातीसाठीची मागणी कमी झाली. त्यामुळे हळदीच्या दरावर काहीसा दबाव वाढला होता. हळदीचे वायदे आता १९ हजारांवरून १४ ते १५ हजारांच्या दरम्यान राहत आहेत. तर बाजार समित्यांमधील भाव १२ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान आहेत. हंगामातील उच्चांकी दरावरून वायदे आणि बाजार समित्यांमधील भाव कमी झाले आहेत. पण वाढत्या मागणीबरोबर दरातही काहीसे चढ उतार दिसत आहेत.

मागील तीन ते चार हंगामांमध्ये हळदीला कमी भाव मिळाला होता. त्यामुळे मागील हंगामात शेतकऱ्यांनी हळदीची कमी लागवड केली होती. तसेच यंदाही ऐन लागवडीच्या काळात हळदीचे भाव दबावातच होते. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांनी लागवडी कमी केल्या. त्यातच यंदा जून महिन्यात पावसाने दडी दिली. जुलै महिन्यातही कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस पडला. ऑगस्ट महिनाही कोरडा गेला. यामुळे हळद लागवड कमी होऊन पिकाला फटका बसला. हळद पिकाल पाण्याचा ताण बसला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

यंदा महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या महत्वाच्या हळद उत्पादक राज्यांमधील लागवड यंदा २० ते २५ टक्क्यांनी कमी झाली, असे जाणकारांनी सांगितले. लागवड कमी झाली त्यातच यंदा गेल्या आठ वर्षांमधील सर्वात कमी पाऊसमान राहण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम उत्पादकतेवर होण्याची शक्यता आहे. त्यातच देशातून यंदा हळद निर्यात चांगलीच वाढली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत हळद निर्यातीत १६ टक्क्यांची वाढ झाली. पण मागील दोन महिन्यांपासून देशांतर्गत हळदीचे भाव वाढल्याने निर्यातीवर परिणाम झाला. याचा दबाव भावावर दिसत आहे.

सध्या हळदीच्या दरवाढीला ब्रेक लागला. पण पुढील काळात सणांची मागणी आणखी वाढू शकते. सणांची मागणी वाढल्यानेच मागील काही दिवसांपासून हळदीच्या भावात तेजी आली होती. यंदा हळद पिकाला दुष्काळाचा फटकाही बसत आहे. तर निर्यातीला मागणीही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात हळदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे जाणकारांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT